पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२९०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करावेच लागेल अशी भावना सर्वदूर युतीच्या कार्यकर्त्यांतही होती. मग, शेतकऱ्यांचे व्यापक आंदोलन उभे करायचे असेल, तर ते काँग्रेस शासनाच्या काळात त्यांच्या विरुद्धच केलेले बरे अशी, अगदी प्रामाणिक कार्यकर्त्यांचीही, भावना झाली असणार.
 येत्या काही दिवसांत काँग्रेस आघाडीचे शासन मुंबईत सत्तारूढ होईल. त्यानंतर लवकरच, निवडणुकीच्या निकालांची अधिक व्यापक पाहणी करून निष्कर्ष काढावे लागतील आणि कर्जमुक्तीसाठी आंदोलन उभे करावे लागेल. त्याची घोषणा होण्यापूर्वी कर्जमुक्ती ही शेतकऱ्यांची गरज आहे का शेतकरी कार्यकर्त्यांची गरज आहे, याचा स्पष्ट निर्णय होणे आवश्यक आहे.

(२१ ऑक्टोबर २००४)

◆◆








पोशिंद्यांची लोकशाही / २९२