पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२८८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पक्षाचा असण्याची शक्यता दिसते.
 पाचशेवर शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्या. या आत्महत्यांचे सर्वांत निर्णायक आणि प्रबळ कारण कर्जबाजारीपण आहे. विशेषतः, सहकारी बँकांच्या वसुली अधिकाऱ्यांनी कर्जवसुलीकरिता वापरलेले कडक धोरण आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रतिष्ठेला आणि आत्मसन्मानाला लागणारा धक्का हे आत्महत्यांचे खरे कारण आहे; याबद्दल काहीही वाद नाही आणि तरीही, कर्जबाजारीपणा संपवण्याच्या कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी मतदान केले नाही.
 मतदारांच्या या कौलाचा काय अर्थ आहे?
 १) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घोषणेवर शेतकऱ्यांचा विश्वास बसला नाही. यापूर्वीही शिवसेनेने वचननाम्यात कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते, लोकांनी युतीला निवडूनही दिले होते. पण, युतीच्या सरकारने कर्जमुक्ती तर केली नाहीच उलट, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर करण्याच्या नावाखाली महत्त्वाच्या पाच शेतीमालांचे भाव पाडण्याचे धोरण अवलंबले. २४ लाख नोकऱ्या, ४० लाख घरे अशा निवडणुकीतील घोषणाही प्रत्यक्ष कारकिर्दीत वावदूक ठरल्या. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी २००४ पूर्वी असल्या आश्वासनांची रेवडी उडवली होती. २००४ सालच्या या घोषणेत काही अधिक अर्थ आहे असे शेतकऱ्यांना वाटले नसावे. औरंगाबादला बाळासाहेब ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा करताना शेतकरी संघटनेचा उल्लेख केला, पण शब्द मात्र 'कर्जमाफी' असा वापरला. 'कर्जमुक्ती' या विषयावर शेतकरी संघटनेने उदंड साहित्य प्रकाशित केले आहे. त्यासंबंधी शिवसेनेतील नेत्यांना काही जाण दिसली नाही. एकूण निवडणुकीच्या जागावाटपात २८८ जागांपैकी शेतकरी संघटनेच्या वाट्याला केवळ सात जागा आल्या. एवढ्याशा ताकदीने स्वतंत्र भारत पक्षाचे आमदार युतीला कर्जमुक्ती करण्यास भाग पाडू शकणार नाहीत असेही शेतकऱ्यांना वाटले नसावे. त्या मानाने फुकट वीज आणि व्याजमाफी हा आघाडीचा कार्यक्रम त्यांना अधिक प्रामाणिक म्हणून भावला असावा.
 २) वर्षानुवर्षे अन्याय आणि विषमता सोसत राहणाऱ्या समाजाची अस्मिता मरून जाते; आपण कधी काळी इतर समाजांप्रमाणे सन्मानाने आणि सुखाने जगू शकू ही भावना नष्ट होते. शेकडो वर्षांच्या गरिबीच्या आणि कर्जबाजारीपणाच्या जिंदगानीतून आपण मोकळे होऊ हे त्यांना स्वप्नवत् वाटते. त्यापेक्षा, वर्तमानात समोर उभ्या ठाकलेल्या मालकापुढेच नतमस्तक व्हावे आणि आजचा दिवस

पोशिंद्यांची लोकशाही / २९०