पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२७९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असे आज राज्यसभेतील चित्र आहे.
 राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये स्वतंत्र भारत पक्षाने प्रवेश केला आहे; पण मी राज्यसभेवर निवडून येईपर्यंत या आघाडीच्या एकाही बैठकीचे निमंत्रण मला आले नव्हते; मी दिल्लीत संसद सदस्य म्हणून काम सुरू केल्यानंतरही निमंत्रण येईना. शेवटी, पंतप्रधानांनी रालोआच्या लालकृष्ण अडवाणी आदी नेत्यांना ते भेटायला गेले असता चांगली वर्तणूक दिली नाही, या कारणास्तव लोकसभेवर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयात मी सामील झालो नाही, एवढेच नव्हे तर काँग्रेसने त्या वेळी प्रश्नाचा तास बंद करून, अंदाजपत्रकाविषयी चर्चा करावी असा आग्रह धरला, त्याला विरोध करणारी भाषणे पॉली नरीमन, अलेक्झांडर, मी अशा काही चारपाच जणांनी केली. ते भाषण केल्याबरोबर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला जाग आली आणि दुसऱ्या दिवशी जी बैठक झाली त्या बैठकीचे मला निमंत्रण आले आणि त्या बैठकीमध्ये स्वतः लालकृष्ण अडवाणी आणि इतर मंडळींनी मला निमंत्रण न दिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि यापुढे नियमित निमंत्रण येत राहील असे आश्वासन दिले. त्यामुळे, रालोआच्या चर्चेमध्ये आपला प्रवेश झाला आहे. त्या दिवशी मीही रालोआला आश्वासन दिले आहे, की स्वतंत्र भारत पक्ष या आघाडीबरोबरच राहून, आपल्या उद्दिष्टांनुसार इतरांमध्ये वैचारिक परिवर्तन घडवून, आपले राजकारण करणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या वेळी आपण जो काही करार केला आहे, त्यामध्ये काहीही बदल करावयाचा प्रस्ताव या कार्यकारिणीसमोर नाही.
 याउलट, दिल्लीला असताना वर्तमानपत्रात अनेक उलटसुलट बातम्या येत होत्या. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी शेतकरी संघटनेच्या स्वतंत्र भारत पक्षाला सात जागा सोडल्या असे कोणी म्हणत, कोणी म्हणत आठ जागा सोडल्या आहेत. मध्ये एका वेळी निवडणूक जाहीरनामा तयार करण्याकरिता महाराष्ट्रातील युतीच्या म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या बैठका झाल्या, श्री. बाळासाहेब ठाकरे यांना जाहीरनामा समितीचे अध्यक्ष नेमण्यात आले. या बैठकांचे साधे निमंत्रणसुद्धा रालोआचा सदस्य असलेल्या स्वतंत्र भारत पक्षाला किंवा शेतकरी संघटनेला आले नाही. महाराष्ट्रातील युती ही केवळ शिवसेना आणि भाजपचीच आहे, नंतर स्वतंत्र भारत पक्षाची त्यात काय भूमिका आहे त्याचा विचार करूया, असे म्हणत त्याची तारीख अजून काही पक्की ठरली नाही. निवडणुकीची अधिसूचना १३ सप्टेंबरला होणार आहे आणि आजही स्वतंत्र भारत पक्ष रालोआमध्ये असला, तरी महाराष्ट्रातील युतीमध्ये

पोशिंद्यांची लोकशाही / २८१