पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


'भारत'भूमीला वाफसा आला आहे
(लोकसभा १९९१ निवडणुकांचे निकाल)


 ९९१ सालच्या मध्यावधी निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. उरलेले निकाल २० तारखेच्या सकाळपर्यंत लागतील. जे निकाल हाती लागले आहेत त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, की निवडणुकीच्या निकालात कोणताही चमत्कार नाही. निवडणुका जाहीर झाल्या त्या वेळी, जे निर्णय लागतील असे वाटले होते जवळजवळ तसेच निर्णय थोड्याफार फरकाने लागले आहेत.
 एवढा प्रचंड खर्च, दंगे, मारामाऱ्या, रक्तपात, माजी पंतप्रधानांची हत्या, निवडणुका पुढे ढकलणे एवढ्या सगळ्या घटना घडूनही निवडणुकांतून आश्चर्यजनक असे काहीच बाहेर पडले नाही. स्थिर सरकार मिळण्यासाठी लोकांकडे जाऊन पुन्हा एकदा आदेश मागण्याची कल्पना फोल ठरली आहे. मतदारांनी पुढाऱ्यांना पुन्हा एकदा निक्षून सांगितले आहे की तुमच्यापैकी स्पष्ट बहुमत प्राप्त करण्याच्या पात्रतेचा कुणीच नाही; तुम्ही सगळ्यांनी एकत्र बसून देशाचा कारभार चालवावा अशीच लोकांची इच्छा आहे.
 भविष्यकाळामध्ये कोणी एखादा अद्वितीय, देदीप्यमान नेता पुरुष किंवा स्त्री अवतरल्यास पुन्हा कदाचित त्या नेत्याला किंवा त्याच्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवता येईलही. अन्यथा, एकपक्षीय शासनाचा कालखंड संपला आहे, हे स्पष्ट आहे.

 शेतकरी आंदोलनाने असा दिवस उगवावा यासाठी अट्टहास धरून प्रयत्न केला. जी भूमी तयार व्हावी यासाठी गेली दहाबारा वर्षे मेहनत घेतली, त्या भूमीला वाफसा आला आहे. आता सर्वच पुढारी जवळपास सारख्याच आकाराचे झाले आहेत. आता छोटा चोर मोठा चोर असा भेदभावसुद्धा करण्याचे कारण नाही. राजकीय संतुलन तयार झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या आंदोलनात यश मिळवणे जास्त सुलभ होणार आहे; पण या संधीचा फायदा

पोशिंद्यांची लोकशाही / २९