पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२३७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

केवळ यंत्र झाले आहे.
 दोनच पुरे!
 येणारा जमाना आघाड्यांचा आहे हे लक्षात घेऊन मतदारांनी प्रथमतः आघाड्यांचे कटुंबनियोजन केले पाहिजे व आघाड्यांची संख्या दोनवरच ठेवली पाहिजे. तिसऱ्या डाव्या लोकशाही आघाडीचा पर्याय या वेळी संपुष्टात येणारच आहे, या आघाडीचे कालबाह्य डावे विचारच तिला संपविणार आहेत. मतदारांनी या डाव्या मंचाच्या मरणयातना कमी करून, त्यांना लवकर संपवून टाकावे. यातच देशाचे व लोकशाही व्यवस्थेचे भले आहे. बाकीच्या किरकोळ व प्रादेशिक आघाड्यांचा फारसा विचार करण्याचीही गरज नाही. त्या आपोआपच कालाच्या उदरात गडप होणार आहेत.
 २००४ च्या लोकसभा निवडणुकांत मतदारांसमोर दोनच प्रमुख पर्याय आहेत - राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेसप्रणीत आघाडी.
 राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेस
 या दोन विकल्पांतूनच भारतीय मतदाराला अंतिम निवड करावयाची आहे. २००४ च्या या निवडणुकीत आणि स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्या, १९५२ सालच्या निवडणुकीत एक साम्य आहे. १९५२ च्या निवडणुकीत देशाच्या कोणत्याही प्रदेशातील कोणत्याही कोपऱ्यातील मतदाराचा कल स्पष्ट होता. निवडणुकीनंतर पंतप्रधान पंडित नेहरूच होणार याबाबतीत एक सार्वत्रिक एकवाक्यता होती. पंडित जवाहरलाल नेहरू त्या वेळी काँग्रेस पक्षाचे अविवाद्य नेते होते. पंतप्रधान म्हणून त्यांच्या निवडीबद्दल १९५२ मध्ये एकवाक्यता असावी हे समजण्यासारखे आहे. पण, आज ५२ वर्षांनंतर कोणाही एका पक्षाला बहुमत मिळणे अशक्य असताना २००४ च्या या निवडणुकीत श्री. अटलबिहारी वाजपेयी हे १४ व्या लोकसभेत पंतप्रधान असतील, याबद्दलची एकवाक्यता मोठी आश्चर्यजनक आहे.
 वाजपेयींच्या नेतृत्वाबद्दलचा हा सार्वत्रिक आत्मविश्वास - याला कोणी इंग्रजीत 'Feel Good' म्हटले, कोणी 'Indea Shining' म्हटले; राष्ट्रभाषेत त्याचे रूपांतर 'भारत उदय' झाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे समर्थक 'Feel Good'ची भाषा करतात, तर त्यांचे विरोधक 'Feel Bad' चे रडगाणे लावतात. दोघांचीही बाजू मतदारांनी नीट समजून घेतली पाहिजे. 'भारत उदया'बद्दल वर्तमानपत्रांत, टेलिव्हिजनवर प्रचाराची मोठी आतषबाजी पाहायला मिळाली. देशातील विविध क्षेत्रांत गेल्या ५-६ वर्षांत किती प्रगती झाली याचे विश्वसनीय-

पोशिंद्यांची लोकशाही / २३९