पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२०१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मिळाल्यामुळे इस्लामचा नाश होणार आहे, तर इस्लाम खरंच 'खतरे में' आहे.
 थोडक्यात, मला मी सुरू केलेल्या स्वातंत्र्याच्या लढाईत स्वातंत्र्याच्या सैनिकांची पीछेहाट होताना दिसते आहे; म्हणून मी माझ्या फौजेची पुन्हा बांधणी करतो आहे. अल्पसंख्याक आघाडीचे हे पहिले शिबिर म्हणजे या पुनर्बाधणीच्या प्रक्रियेची सुरुवात आहे. स्वातंत्र्याचे हे युद्ध विजय मिळेपर्यंत चालूच राहणार आहे. नवीन बांधणीची फौज उभी राहिल्यानंतर जी लढाई होईल, तीमध्ये नेतृत्व करण्याची ताकद माझ्यामध्ये, कदाचित्, उरणार नाही; पण तुमच्यासारखे जे नवीन पिढीतील सेनापती तयार होत आहेत, त्यांच्यासाठी मी निदान फौजेची जमवाजमव तरी करून ठेवली. एवढी जरी माझ्या नावाने नोंद झाली, तरी कयामतच्या दिवशीसुद्धा अल्लाच्या समोर मी उन्नत माथ्याने उभा राहू शकेन.

(२१ जुलै २००५)

◆◆






पोशिंद्यांची लोकशाही / २०३