पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२००

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

धर्म मांडला गेला आणि त्या धर्माचा प्रसार होता होता, आज निम्म्याच्या वर जग इस्लामला मानणारे आहे. इस्लामचे एकसंध बंधुत्व मानणारा, इमान मानणारा, इज्जत मानणारा एक सबंध समाज तयार आहे. त्या समाजाचे नेते म्हणवणारे समाजाचे प्रश्न समजून घ्यायला कधी येत नाहीत. मुसलमानांच्या रोजगाराची परिस्थिती काय आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे, त्यांची मिळकत काय आहे याची चर्चा हे नेते कधी करीत नाहीत. ते फक्त आपल्या मुसलमानपणाचे नाव घेत, मुसलमान समाजाला भडकावून, इतर समाजापासून वेगळं करतात. हिंदू समाजाचे नेते म्हणवणारांनीही हिंदू समाजाच्या मनात तसंच भरवलं. या दोन्ही समाजांच्या नेत्यांनी आपापल्या समाजांना वेगवेगळ्या कोंडवाड्यात घातले आहे. आज मुस्लिम समाजाचे नेते मुसलमानांना सांगत आहेत, की सगळं जग खुलं होत आहे, भिंती पडत आहेत, ही फार धोक्याची गोष्ट आहे. वर त्यांनी म्हटलं नाही म्हणजे नशीब, की 'इस्लाम खतरे में है।'
 ज्या इस्लामची सुरुवातच मुळात भिंती पाडण्याच्या कल्पनेने झाली, त्या समाजाच्या आजच्या नेत्यांनी त्यांना सांगावे, की जर भिंती पडत गेल्या, तर 'इस्लाम खतरे में है।' ही इस्लामच्या दृष्टीने मोठी शोकांतिका आहे.
 माझ्या स्वातंत्र्याच्या लढाईसाठी फौजेची पुनर्बाधणी म्हणून मला ज्या नव्या जोमाच्या फलटणी उभ्या करायच्या आहेत, त्यांत मुसलमान समाजाची फलटण असणार आहे. मुसलमान समाजात इमानानं काम करणारी माणसं आहेत, आजचा रोजगार सुटला, तर भिकेचा मार्ग न धरता, दुसऱ्या दिवशी दुसरा रोजगार शोधण्याची हिंमत असणारी माणसे आहेत, हे आपल्याला वेळोवेळी अनुभवायला मिळतं. अशा खऱ्याखुऱ्या उद्योजक माणसांची फलटण मला उभी करायची आहे. हा समाज स्वातंत्र्याच्या लढाईत माझ्या बाजूने असणे मला आवश्यक आहे. आवश्यक तर या समाजाचं उदाहरण मला बहुसंख्याकांसमोरही ठेवायचं आहे. अल्पसंख्याक आघाडीच्या माध्यमातून मी अशा उद्योजक माणसांची एकी साधतो आहे, पोथीनिष्ठ लोकांची नाही. जे केवळ शब्द वाचतात आणि त्या शब्दांच्या आधाराने आपल्या स्वार्थाचे समर्थन करतात, त्यांना येथे स्थान नाही. पैगंबराची प्रेरणा काय होती, हे ज्यांना समजले आहे, त्या काळच्या अत्यंत वेगळ्या परिस्थितीमध्ये कुराणाने जे काही सांगितले, ते समजावून घेऊन, आज पैगंबर असते, तर आजच्या या परिस्थितीत त्यांनी काय आदेश दिला असता, तो जे समजून घेतील, अशा लोकांची मला एकी करायची आहे. हा इस्लामचा खरा विजय असेल; पण जर कोणी असं म्हणायला लागलं, की स्वातंत्र्य

पोशिंद्यांची लोकशाही / २०२