पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१८६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





समाजवादी संरचना
(स्वतंत्र भारत पक्ष जाहीरनामा लेखांक :६)


 माजवादी व्यवस्था कोसळायला लागली, की त्याचे काही दृश्य परिणाम समोर येऊ लागतात. पुनःपुन्हा वीज जायला लागते; लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल पाठवायचा असतो; पण रस्ते उपलब्ध नसतात; टपाल लवकर पोचत नाही, टेलिफोन लागत नाही वगैरे वगैरे. या सर्व उणिवांमुळे सार्वजनिक नियोजन करताना या मंडळीचं म्हणणं असं असतं, "एखादी व्यक्ती किंवा कंपनी स्वार्थापोटी गुंतवणूक करते, तेव्हा समाजासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी केल्या जात नाहीत. समाजाला रस्त्यांची गरज असते, पाणी अडवण्याची गरज असते, पाणीपुरवठा योजना करण्याची गरज असते, पेट्रोलच्या पाइपलाइनची गरज असते, तारव्यवस्थेची गरज असते, टपाल व्यवस्थेची गरज असते वगैरे वगैरे. या सर्व व्यवस्था काही टाटा-बिर्ला करणार नाहीत; म्हणूनच या व्यवस्था चांगल्या रीतीनं व्हाव्यात यासाठी सामाजिक व्यवस्था आणि नियोजन करणं आवश्यक असतं." हा समाजवाद्यांचा महत्त्वाचा मुद्दा असतो.
 त्यांचा दुसरा मुद्दा असा असतो, "मुक्त व्यवस्थेत गलेलठ्ठ भांडवलदार अधिक गलेलठ्ठ होतात आणि गरीब हे अधिकाधिक गरीब होत जातात." खरं म्हणजे समाजवादी देशांतील संरचना - इन्फ्रास्ट्रक्चर हे मजबूत असलं पाहिजे; पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे रशियाचं पोस्टमार्टम झालं तेव्हा याच्या नेमकी उलट परिस्थिती असल्याचं आढळून आले. तिथं झालेलं बांधकाम अत्यंत कमी प्रतीचं आहे, असं आढळून आलं. समाजवादी देशात कशी प्रगती होते, ते दाखविण्यासाठी स्टॅलिनच्या काळात मॉस्कोमधील अंडरग्राउंड रेल्वे उदाहरण म्हणून दाखवण्यात येत असे. "भांडवलशाही व्यवस्थेमध्ये भांडवलदारांची घरं संगमरवरी दगडानं बांधली जातात, आम्ही मात्र रेल्वे स्टेशनं बांधण्यासाठी संगमरवरी दगड वापरतो," अशी शेखी मिरवली जात असे; पण नंतर, अंडरग्राउंड

पोशिंद्यांची लोकशाही / १८८