पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१७९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

घटनेमध्ये अमुक-अमुक दोष आहे. चंडीगडच्या एका मोठ्या वकिलाशी मी चर्चा करीत होतो. ते म्हणाले, 'मुळात घटनेनुसार सरकारला कोणत्याही व्यवसायात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नव्हता. तशी तरतूद घटनेत करण्यात आलेली होती; पण पहिल्या घटना दुरुस्तीत ती तरतूद रद्द करण्यात आली. त्यामुळे सरकारला आज कोणत्याही व्यवसायात हस्तक्षेप करण्याचा काहीही अधिकार नव्हता. तशी तरतूद घटनेत करण्यात आलेली होती; पण पहिल्या घटना दुरुस्तीत ती तरतूद रद्द करण्यात आली. त्यामुळे त्यामुळे सरकारला आज कोणत्याही व्यवसायात हस्तक्षेप करता येतो. ते वकील म्हणाले, 'तुम्ही बाकी काहीही करू नका, फक्त अमेंडमेंट वन रद्द करून घ्या! फार भयानक ॲमेंडमेंट आहे. त्याचा आर्टीकल ३१ शी म्हणजे प्रॉपर्टी राइटस्शीसुद्धा संबंध आहे.' गोष्ट खरी आहे; पण मी त्यांना म्हणालो, 'अमेंडमेंट झाली नसती म्हणजे गोंधळ झाला नसता असं थोडंच आहे? घटनेत तरतूद नसतानाही प्लॅनिंग कमीशन झालं की नाही? घटनेत तरतूद नसतानाही प्लॅनिंग कमीशन झालं की नाही? घटनेत नसलेल्या अशा कितीतरी गोष्टी आज झालेल्या आहेत.' लोकांची समजूत असते; पण कायद्याने सुधारणा होत नाहीत. अशी स्वतंत्र भारत पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. समाजसुधारणा करणे हे कायद्याचे काम नसते. संमतिवयाचा कायदा करणे कायद्याचे काम नसते. संमतिवयाचा कायदा होऊन किती वर्षे झाली? पण तरीही आजही माझ्या गावात लग्न करणाऱ्या मुलीचं वय अठरा वर्षांपेक्षा कमीच असतं. हुंडाबंदीचा कायदा झाला, तरीही कुठंही हुंडा थांबलेला नाही. कायद्याने समाजसुधारणा घडून येत नाही. समाजातील पद्धती इतिहासाप्रमाणे, कालमानाप्रमाणे, भौगोलिक गरजांप्रमाणे, सामाजिक गरजांप्रमाणे तयार होत असतात. कोण्या मनूनं सांगितलं म्हणून त्यानुसार समाजरचना ठरत नसते. बाप मोठा जमीनदार असला, हजार-पाचशे एकर जमीन मिळणार असली, तर पोरं बापाच्या समोर बसतसुद्धा नाहीत! बापाविषयी जी पूज्य भावना दाखवली जाते, त्याचा सरळ संबंध बापाकडून अपेक्षित जमीनजुमल्याशी असतो. तेच जर का बापाकडनं काही मिळणार नसेल, तर पोरं बापाला अक्कल शिकवायला मागे पाहत नाहीत. नवराबायकोंचे संबंध काय असावेत तेसुद्धा काळाप्रमाणं ठरत असतं; तर हिंदू धर्माचे रूढ कायदे, रीतीरिवाज पाहून, त्याआधारे हिंदू कोड बिल तयार करण्यात आलं. त्याच्यावर प्रचंड वादविवाद झाला आणि शेवटी आंबेडकरांना हिंदू कोड बिलाचा फक्त छोटासा तुकडा मान्य करून घेता आला आणि त्यानंतर ते राजीनामा देऊन बाहेर पडले.
 हिंदू कोड बिलामध्ये ज्या समान नागरी तरतुदी हिंदू समाजावर लादण्याचा

पोशिंद्यांची लोकशाही / १८१