पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१७७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


समान नागरी कायदा
(स्वतंत्र भारत पक्ष जाहीरनामा लेखांक : ५)


 स्लाम हा आंतरराष्ट्रीय धर्म आहे; तर हिंदू हा एकराष्ट्रीय धर्म आहे. नेपाळ आणि अनिवासी भारतीय सोडल्यास, हिंदू हा एका राष्ट्राचा धर्म आहे. मुसलमान समाजामध्ये ज्या काही चालीरीती आहेत, त्या त्यांच्या धर्मग्रंथात सांगितल्यानुसार आहेत. मुसलमान समाजात मुलगी कन्यादान किंवा संस्कार म्हणून दिली जात नाही, तर लग्न हा करार आहे. त्या करारामध्ये लग्नाच्या अटी ठरतात. मुलाला काय द्यायचं, बायकोला टाकून दिलं तर तिला काय द्यायचं, अशी कराराची पद्धत आहे. मुलीला वारसाचा हक्क जास्त स्पष्टपणे दिलेला आहे. राष्ट्रीय मुसलमान असं म्हणतात, "राजकीय प्रश्नांच्या बाबतीत आम्ही भारतीय आहोत, या राष्ट्राशी आमची निष्ठा आहे; पण जे प्रश्न राजकीय नाहीत, ज्या प्रश्नांचा सरकारशी संबंध नाही, ज्या प्रश्नांचा संबंध अल्लाशी आहे, त्या संदर्भात तुम्ही नियम करू नका. आम्हाला जे ग्रंथ पवित्र वाटतात त्या ग्रंथांप्रमाणे वागण्याची मुभा आम्हाला असली पाहिजे." आणि हिंदुत्ववाद्यांना या कल्पनेचा मोठा राग आहे. ते असं म्हणतात, "मुसलमान आमचे कायदे का मानत नाहीत? एका राष्ट्रातल्या सगळ्या लोकांचा समान नागरी कायदा असायला काय हरकत आहे?" याला मुसलमानांचं उत्तर असं आहे, "आम्ही तुमचे बाकीचे सगळे कायदे मानतो; पण नैतिकतेच्या प्रश्नावर आम्हाला अल्लाच्या दरबारात उत्तर द्यायचं आहे. तेव्हा त्याच्या शब्दाप्रमाणे जी काही नीतिमत्ता ठरलेली असेल, त्यानुसार आम्ही वागू."
 याच्यात थोडा भामटेपणा आहे. भामटेपणा असा, की कुराणामध्ये काही फक्त नागरी कायदा सांगितलेला नाही. गुन्हेगारी कायदाही सांगितलेला आहे. गुन्हेगारी कायदा असा आहे, "कुणी जर चोरी करताना पहिल्यांदा सापडलं, तर त्याच्या डाव्या हाताची बोटं तोडावीत, मग हात तोडावेत." असं बरंच काही आहे. कुणी म्हणेल, 'हा किती रानटी धर्म आहे बघा!' पण फक्त पुराणातच अशा शिक्षा

पोशिंद्यांची लोकशाही / १७९