पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१७६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 महत्त्वाचं म्हणजे, लोकसभा व विधानसभांमये प्रतिनिधित्व मिळाले यासाठी स्त्रियांना राखीव जागा देण्याचा प्रश्न आहे, मतदारसंघ देण्याचा नाही. प्रत्येक मतदारसंघातल्या तीन जागांपैकी एक जागा ही महिलांकरिता राखीव; पण बाकीच्या दोन जनरल जागांवर त्या निवडून येऊ शकतात.
 संयुक्त मतदारसंघात प्रत्येक मतदार तीन, ट्रान्स्फरेबल मतांचा अधिकार देऊन या प्रश्नावर अशा तऱ्हेने समाधानकारक तोडगा निघू शकतो.

(शब्दांकन : श्री. रमेश राऊत, औरंगाबाद.)

(२१ ऑगस्ट २०००)

◆◆








पोशिंद्यांची लोकशाही / १७८