पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१६५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

काहीतरी पाठ वाचताना दिसत होती. त्यामुळं अभ्यास, वाचन, पाठांतर करणं यात काहीतरी फायद्याचे आहे, अशी जाणीव एक ब्राह्मण मुलगा म्हणून माझ्या मनामध्ये तयार झाली. त्याचा मला जो फायदा मिळाला, तो मागासवर्गातल्या श्रीमंत विद्यार्थ्यालासुद्धा मिळणं शक्य नव्हतं. बाप जे करतो तेच मुलगा करायचा प्रयत्न करतो आणि आई जे करते तेच करायचा प्रयत्न मुलगी करते.
 तसं करण्यात काही वाईटही नाही. सुतारीचा धंदा तोट्याचा नसता तर बापाकडनं लहानपणापासून रंधा मारण्याचं, सुतारीचं काम शिकलेला मुलगा कुटुंबपरंपरेनं कदाचित, अधिक कुशल सुतार बनला असता; पण सुतारकामातून काही सुटत नाही, शेतीतून काही सुटत नाही. फक्त नोकरीतच अर्थ आहे, असं लक्षात आल्यानंतर सगळे नोकऱ्यांच्या मागे लागले आणि त्यासाठी आलेल्या शिक्षणपद्धतीत ब्राह्मणेतर मागे पडले. जर शाळेतला पहिला धडा 'ग गणेशाचा' ऐवजी एक लाकूड घ्या आणि रंधा मारून ते सरळ करून दाखवा. असा असता तर मी मागे पडलो असतो आणि बाकीच्या व्यवसायातली मुलं पुढं गेली असती. इथं वापरण्यात आलेली शिक्षणाची पद्धत केवळ सवर्णांच्या सोयीची होती. काहीही झालं तरी ब्राह्मणी विद्येमध्ये वेगळं सामर्थ्य आहे. तर्कशास्त्र, गणित यासाठी लागणारी बौद्धिक तयारी त्यांच्याकडे होती. मी काही शिक्षणशास्त्रात जात नाही; पण ब्राह्मण घरात जन्मल्यामुळं मला मोठा फायदा मिळाला एवढं निश्चित. तो फायदा इतरांना मिळाला नाही. म्हणून त्यांना कृत्रिमरीत्या काही दुसरे फायदे देण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर ते फायदे नाहीत हे माहीत असूनसुद्धा अपंग नसलेला मोठा भाऊ म्हणून त्यांच्यावर टीका करणं हे सद्अभिरुचीला सोडून आहे, असे मी मानतो.
 भटाच्या जागी जर कुणब्याचं पोरगं कारकून म्हणून आलं तर ते चांगलं वागेल, असं महात्मा फुले यांचं म्हणणं होतं; पण आमचा अनुभव असा आहे, की कुणब्याचं पोरगं कारकून झाल्यानंतर भट कारकून परवडला; कुणी नको असं म्हणायची वेळ आली. अशा तऱ्हेनं आपण एखाद्याला खुर्चीवर आणून बसवतो तेव्हा त्या माणसाचं महत्त्व वाढवण्याऐवजी खुर्चीचंच महत्त्व कमी होत जातं.
 पूर्वी अमेरिकेमध्ये डाऊनटाऊनमध्ये म्हणजे, शहराच्या मध्यभागी राहाणं प्रतिष्ठेचं मानलं जात असे. वॉशिंग्टनमध्ये सत्तेची स्थानं राहत असतं. वॉशिग्टनच्या मध्यभागी राहणं मोठ्या सन्मानाचं समजलं जात असे. म्हणून मग सरकारनं तिथल्या निग्रो लोकांना शिकवून, अधिकार देऊन, मदत करून, नोकऱ्या देऊन

पोशिंद्यांची लोकशाही / १६७