पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१४६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





संकटाची चाहूल देणारा जाहीरनामा
(स्वतंत्र भारत पक्ष जाहीरनामा लेखांक : १)


 हुधा कोणत्याही पक्षाचा जाहीरनामा तयार करताना एक यादी बनवली जाते. आमच्या हाती जर सत्ता आली - शासन आलं, तर आम्ही काय काय करू, ते जाहीरनाम्यात सांगितलेलं असतं. जाहीरनाम्यामधली काही कलमं ही लिहिणाऱ्या माणसांच्या मनामधील स्वप्नं पूर्ण झाल्याच्या कल्पना असतात. संपत्तीची समान वाटणी असावी, गरिबी नसावी, बेकारी नसावी, महागाई कमी व्हावी, शिक्षण मोफत असावं वगैरे, वगैरे. त्यापलीकडं जाऊन, लोकांना खुश करण्यासाठी काही योजना असतात. एक रुपयाला झुणका-भाकर, बेरोजगारांना दर महिन्याला भत्ता, म्हाताऱ्या लोकांना पेन्शन, शेतमजुरांना पासष्ट वर्षे वय झाल्यानंतर पेन्शन वगैरे, वगैरे.
 या योजना तीन प्रकारच्या असतात. एक म्हणजे ज्याबद्दल सर्वसाधारणपणे सर्वांचे एकमत असतं, अशा योजना जाहीरनाम्यात असतात. आपण म्हटलं, नाही असं व्हायला नको. म्हणजे दुसरे म्हणणार, की बेकारी गेली पाहिजे, तर ते आपल्या जाहीरनाम्यात नाही, असं व्हायला नको. दुसरी गोष्ट म्हणजे जाहीरनामा लिहिणारांची काही स्वप्नं असतात. सगळ्या पक्षांची स्वप्नं काही तीच असतात, सारखीच असतात, असं नाही. अमुक-अमुक जातीसाठी राखीव जागा असतील, स्त्रियांकरिता राखीव जागा असतील, अशा तऱ्हेची ही स्वप्नं असतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या जनसमुदायांना, वेगवेगळ्या वर्गांना खुश करण्याकरिता केलेल्या काही कल्पना असतात. सर्वसाधारणपणे जाहीरनाम्यांचं स्वरूप असं असतं.
 या सर्व गोष्टींचा कुणी फार अभ्यास वगैरे केलेला असतो असं नाही. जाहीरनामा तयार करण्याकरिता जी मंडळी बसलेली असतात, त्यतं समजा एकजण भटके व विमुक्तांत काम करणारा माणूस आहे. तो पटकन् म्हणतो, की या जाहीरनाम्यात

पोशिंद्यांची लोकशाही / १४८