पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१३७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे. शासन सुटसुटीत आटोपशीर बनत नाही. सभागृहातील सदस्यांना कामकाजात परिणामककारकरीत्या भाग घेता येत नाही. सभागृहात प्रवेश करण्यासाठी प्रचंड पैसा असल्याशिवाय चालत नाही आणि गुन्हेगारी इतिहास निवडणुकीत अडचण होत नाही. हे सर्व समाजवादी व्यवस्थेत अपरिहार्य आहे. सभागृहातील हा गोंधळ चालू राहिला, की लोकशाहीविषयी कुत्सित उद्गार काढणारे, हुकूमशाहीचा पुरस्कार करणारे जंतू वळवळू लागतात. लोकशाहीत अनेक दोष आहेत; पण लोकशाहीपेक्षा अधिक चांगली व्यवस्था कोणतीही नाही, असे सांगण्याऐवजी ठोकशाहीतून लोकांचे प्रश्न सोडवण्याची भाषा सुरू होते. हिटलरपूर्व जर्मनीत झालेल्या घडामोडींची पुनरावृत्ती नको असेल, तर अनेक तऱ्हांनी अनेक आघाड्यांवर प्रयत्न करावे लागतील; पण त्यांतील सर्वांत महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे, 'न पेलणाऱ्या आर्थिक जबाबदाऱ्या बाळगणाऱ्या शासनाची छाटणी,' यात काही संशय नाही.

(६ ऑगस्ट १९९७)

◆◆

पोशिंद्यांची लोकशाही / १३९