पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/११८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राहतात. मालक राहिलाच नाही, म्हणजे गुलामीच्या बेड्या तोडण्याची खटपट चालू होते. झुणका-भाकरही मिळत नाही असे दिसले म्हणजे गुलाम बेड्या आपटू लागतात. या निवडणुकीत देशाला 'रक्त, घाम आणि अश्रू' असा पर्याय देण्याच्या कुवतीचा कोणी 'चर्चिल' नाही; पण असा कोणी असेल, तर केवळ दोनचार वर्षांच्या काळातच आर्थिक कडेलोट झाल्यानंतर अशा 'चर्चिल'च्या शोधात देशाला जावे लागेल. तेव्हा शांतिदूत म्हणून गाजलेले 'चेंबर्लेन' हास्यास्पद ठरलेले असतील आणि जिद्दीने देशाची मान उंचावू पाहणाऱ्याचे श्वास मोकळे होतील!

(२१ एप्रिल १९९६)

◆◆









पोशिंद्यांची लोकशाही / १२०