Jump to content

पान:पेशवाईतील धामधुमीचा देखावा अथवा सरदार परशुरामभाऊ पटवर्धन यांचे पराक्रम.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४० परशुरामभाऊ पटवर्धन यांचे पराक्रम, हळहळले. तात्या वारल्यावर त्यांचें काम बाबाराव फडके (तात्यांचे चिरंजीव ) पाहूं लागले. भाग ८ वा. खर्ज्याची लढाई. श्लोक. केला हल्ला सवाई प्रभुनिजकटकें, भाऊनें मार दिल्हा । तेव्हां किल्ला परांडा जवळही असतां जाहला दूर पल्ला ॥ नाहीं गल्ला न पाणी यवन तळमळी 'यानवी यारअल्ला' । बोले सल्ला करो जी अबहे गनिमको चाहिसो देवजिल्हा || महादजी शिंद्याचा अवतार संपून पेशव्यांच्या दर- बारांत स्थीरस्थावर होत आहे तोंच पेशव्यांचा जुनाट व बलाढ्य शत्रू जो निझामअल्ली त्याचे बाहू स्फुरण पावावयास लागून पेशव्यांबरोबर दोन हात करण्या- विषयीं तो उत्सुक झाला. तेव्हां अर्थातच त्याच्या बोलावण्यास मान देऊन त्याची मनीषा पूर्ण करण्याक- रितां इ. स. १७९५ मध्यें परशुरामभाऊंला आप- ली तलवार पाजविणें पुनः प्राप्त झालें. त्या लढाईचा प्रकार असाः -- इ. स. १७९५ त नानाफडणिसांनीं गोविंदराव काळे यांस निझामचे दरबारीं चौथ व सरदेशमुखी