उपदेश विशेष प्रार्थना. पद-राग असावरी ताल त्रिवट । देवा मज तारी । सदया | पुरे हाल हे बहुत त्रासलों षड्रेिषु म जला गांजिति भारी ॥ धु० ॥ विषयामाजी गुंग होउनी । तव स्वरूपातें जाय भुलोनी | भवपय फारचि निकर म्हणोनी । आलो शरण तुला देवा || करि करुणा बा या दीनावर | संकट तुजविण कोण निवारी || देवा मज० ॥ १ ॥ भजन. पद भैरवी ताल त्रिवट, शरण आलो चरणासी || देवा ॥ आतां अंत कितीं पाहसी ॥ धृ ॥ जन्मापासुनी जी जी केली त्या न गणी दुरितांसी || शरण० ॥ १ ॥ धरणें तुझिया द्वारिं घेतलें तारीं मज दीनासी ॥ शरण० || २ || दीन दयाळा मज तारुनियां सांभाळी ब्रीदासी || शरण० || ३ || अभंग. 1 ॥ आतां भय नाहीं ऐसे वाटे नीवा || घडलिया सेवा समर्थाची ॥ आतां माझ्या मनें धरावा निर्धार | चितनी अंतर न पडावें ॥ एथे नाही झाली कोणाची निरास || आल्या याचकास कृपेविशीं ॥ तु का म्हणे एयें नाहीं दुजी परी ॥ रायारंकासरी देवा पायी ॥ .
पान:पुणें प्रार्थनासमाज-षोडशोत्सव.pdf/८
Appearance