Jump to content

पान:पुणें प्रार्थनासमाज-षोडशोत्सव.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( 8 ) परि चिर सुख शांती यां सदां मळवावें ॥ १ ॥ नमो विश्वकर्त्या नमो विश्वाळा || नमो मायबापा नृपाळा कृपाळा || नमःसौख्यकंदा नमो विश्वभूपा ॥ नमः सच्चिदानंद शांतिस्वरूपा ॥ २ ॥ अजी मांडीयेलें भजन सुमनें पार्हि जनका || तशी शक्ती द्यावी दिधलिस जशी व्यास सनकां ॥ तुझी लीला गाया सकल वसुधे सौख्यद विभो तुझ्यावीणें नाहीं सबल सहकारी इतर भो ॥ ३ ॥ आनंदे तुजला प्रभो गुणनिधे वंदोनि मांडूं स्तवा || आहो बा मतिमंद दे विमल घी जेणें तरूं या भवा ॥ प्रेमें नाम तुझें अखंड स्मरतां विघ्ने लया पावती || भक्ताते जगदीश देइ तुझिया आनंद धाम स्थिती ॥ ४ ॥ । बेळी पर्जन्य वर्षे अवाने वितरिते धान्य वैपुल्य; होतें | साधूंच्या सत्कृतीचे प्रसरण जगती लोककल्याण होतें; ।। पाप्याचें लक्ष्य तूझ्या हळु हळु भजनी दीसते लागताहे । बापा विश्वंभरा तूं परम सदय की सर्व तूझी कृपा हे ॥ ५ ॥