( ३ ) तुच्छ मानूनी विषय सुखें ही लागूं तव भक्तीला || द्यावी ऐशी बुद्धि बालकां गाउं सदां तव लीला || हेंची मागतसो || अन्य न कांही वांच्छितों ॥ २ ॥ किती दयेनें देवा पाळिशि अनुदिन तूं ह्या बाला ॥ विमल हृदय हे करुनि पेरुनी भक्तिरूप बीजाला || ऐशी करणि तुझी || विलसे सकल जगामाजी || ३ || ४ अभंग. हैंचि माझें तप र्हेचि माझे दान । हेचि अनुष्ठान नाम तुझें ॥ १ हेंचि माझें तीर्थ हेंचि माझे व्रत | सत्य हे सुकृत नाम तुझें || २ || हाचि माझा धर्म हेंचि माझे कर्म । हाचि नित्य नेम नाम तुझें || ३ || हाचि माझा योग हाचि माझा यज्ञ | हेंचि जपध्यान नाम तुझें ॥ ४ ॥ हेचि माझें ज्ञान श्रवण मनन । हेंचि निजध्यान नाम तुझे ॥ ५ ॥ हाचि कुळाचार हाचि कुळधर्म | हाचि नित्यनेम नाम तुझें ॥ ६ ॥ हा माझा आचार हा माझा विचार । हा माझा निर्धार नाम तुझे ||७|| तुका म्हणे दुर्जे सांगायास नाहीं । नामेविण कांही धनवित्त ॥ ८ ॥ ५ श्लोक. अनुदिन तुज देवा शुद्ध भावें नमावें ॥ रत तव गुणगानी होउनीयां रमावें ॥ न कधिं विषयसौख्या सेवनी गुंग व्हावें ॥
पान:पुणें प्रार्थनासमाज-षोडशोत्सव.pdf/५
Appearance