( २ ) ध्यानों रत मन- आमुचें हें होउ घडो सेवा || हेंचि मागणे सदय परेशा तुजपाशी देवा ॥ सदानंद ० || २ || हीन दीन अनुता आम्ही शरण तुला आलों || तारी आम्हां परा- परेशा भवसागरि डुबलों || सुख सुख म्हणतां प्रपंचि सारें दुःखचि अनुभवलों || चटका बसती जागृत होउाने तव भजनों रतलों || परि ह्या षड्पुिपाशी देवा पुनरपि सांपडलों || तुजविण बापा अन्य न तारी, चरणी दृढ जडलो || सदानंद || ३ || २ दिंड्या. || सख्या भगवंता सृष्टिच्या सुमित्रा || परमपुरुषा हे चिन्मया पवि- त्रा || आमुच्या तूं आधार शिथिल गात्रा ॥ तुझी भक्ती बा पाप हारि मात्रा ॥ १ ॥ अखिल ब्रम्हांड प्रभो तूज गातें ॥ तूंचि आश्रय बा एकला जगातें || तुझे आमुचे मी काय व नातें | कोण मानव तो वर्णु शके तूंतें ॥ २ ॥ नाम तुझें बा पापसारी जाळी ॥ मुक्त झाले ते गाति पिटुन टाळी || संत योगी कवि साधु सर्व काळी ॥ ॥ भेटलाशी त्यां दिसे आह्मां डोळी || ३ || ३ साझ्या. विश्वपालका जगन्नायका दीनदयाळा बापा ॥ कृपासागरा भक्तवत्सला वारी या भवतावा ॥ देवा शरण तुला || आलो तारों दीनाला ॥ १ ॥
पान:पुणें प्रार्थनासमाज-षोडशोत्सव.pdf/४
Appearance