Jump to content

पान:पुणें प्रार्थनासमाज-षोडशोत्सव.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुणे प्रार्थनासमाज-पोडशोत्सव. Dodococ रविवार, ता० ५ माहे डिसेंबर सन १८८६ इ०. सकाळच्या आराधनेचा क्रम. भजन. १ भूपाळी. राग विभास. ताल एक्का. सदानंद सुखकंद तयातें सद्भाव वंदा || प्रातःकाळी नम्र होउनी साधा हा धंदा ||धृ०|| रात्र सरुनिया मित्र उदेला उज्वल हा झाला ॥ सुंदर चारी दिशा दाविती प्रभु सामर्थ्याला || थंड वायु हा मंडन क- रितो अखिल सदयतेला ॥ पक्षि वृक्षि हे मुदित होउनी स्तविती त्या प्रभुला || वृक्ष वोले अति सुंदर दिसती गौरविती हरिला ॥ भक्त सुजन अनुरक्त होउनी स्तविती नामाला || सदानंद ० ॥ १ ॥ भक्तिरसानें सिक्त सुमानस आमुचें करि देवा | विनम्र भावा स्या- पुनि तेथें देइ प्रेम मेवा || शमदमादि गुण हृदयि आमुचे प्रगट क रूनि द्यावा || प्रेम रसाचा प्रसाद साचा निजपद सुख ठेवा | तब