( १२ ) मीच एक भक्त मीच एक मुक्त । म्हणती पतित दुराचारी ॥ ३ ॥ नामा म्हणे तुझे कृपेविणे देवा || केंवि जोडे ठेवा विश्रांतीचा ॥ ४ ॥ श्लोक ( शार्दुल. ) विश्वाची जननी सदैव सुमनी संतांनि जी वाहिली राहे जी मननीं, सदा, न परि तैं दृष्टी कदा पाहिली || सर्वांलागि सचेतनस्वरूप जी, सञ्चित्सुखानें भरी त्या विश्वंभर-माय-पादकमलां, साष्टांग तूझ्या घरी ॥ १ ॥ लागो ना मन हें दुज्या स्थळे कदा | हे पापसंहारका निष्ठेनें तुजलागि म्यां स्तवियल्या मुक्ती मिळे तारका || होवो हा दिन आजचा सकळिकां हद्वासना शोधिता चित्ताचा मल काढिता तवपी चिद्वृत्ति जोडिता ॥ २ ॥ बंधूच्या मानें ऐक्य संतत वसो सत्कार्यसद्वर्द्धना होवो भक्ति तुझी सदैव सकळां सोने जसे निर्धना अज्ञानांध असों खरे, बुध जरी वाटे असों या मना, देवा संशय काढ या हृदयिचा, दावीं तयाँ योजना ॥ ३ ॥ आरती. जयदेव जयदेव जयजय जगदीशा । शरणागत तुज आलो घे पदरीं ईशा | ध्रु० ॥ सत्यसनातन तूं प्रभु शिव मंगल दाता || निर अवयव अससी तूं व्यापक गुणवंता || अविनाशी अविकारा विश्वभर त्राता || भवनदतारक अससी सत्यगतीदाता || स्वयं प्रकाशे अवघें अद्भुत
पान:पुणें प्रार्थनासमाज-षोडशोत्सव.pdf/१४
Appearance