(९) सत्तामात्रे स्थिति लय करुनी ने विलयासी ॥ मनुजा० ॥ १ ॥ जो न- गदीश्वर रविशशियां अनुपम दे तेजासी || भूजलपावक निर्मुनी प्राण्या निशिदिनी दे सौख्याशीं ॥ मनुजा ० || २ || आदी मध्य न अंत जयातें नच घरी जो रूपासी || परि दासातें संकटों रक्षुनी राखीत से ब्रीदासी || मनु० ॥ ३ ॥ पद. - राग यमन ताल त्रिवट. - स्तवूं या देवा शांत मनानें, आत्मारामा सेवूं या ॥ तारक तो प्रभु निज भक्तांची घालवि दुखे सर्व लया ॥ध्रु.॥ तत्सान्निध्ये उपभोगूं या प्रेमल त्याची थोर दया धरितो पोटी शरणागत जो अर्पू त्या या निज हृदया ||स्तवूं या ||१|| दमन करूं या सकल मनाच्या दुर्वृत्तींचे तापद या प्रभुचरणों जो नर रत झाला, लाभे अक्षय सौख्य तथा ॥ स्तवं या ॥२॥ उद्बोधन. पद-राग भूपकल्याण-ताल त्रिवट. लागो भजनीं गोडी || सच्चित्घन जो ईश्वर त्याच्या || लागो ०धृ०॥ तापद सारें भवबंधन हे | निज सामर्थ्य तोडी ॥ ला० ॥ १ ॥ अनुदिनों भजम निरत असे त्या | देत सुखाची जोडी ||लागो || २ || बासावरती करुाने कृपा जो । निजपदों नेउाने सोडी || लागो० ॥ ३॥ ॥
पान:पुणें प्रार्थनासमाज-षोडशोत्सव.pdf/११
Appearance