आहे. मी जातो तेथे तुमच्यानें येववणार नाहीं'. सायमन म्हणाला, 'प्रभू, तूं कोठें जातोस? माझ्यानें तुझ्या मागें कां येववणार नाहीं? मी तुझ्यासाठीं जीव देण्याला तयार आहे'. येशूने उत्तर केलें, 'काय म्हणतोस? माझ्यासाठीं आत्मत्यागसुद्धां करशील? अरे भोळ्या शिष्या, तुझ्या हातून हे तर होणारच नाहीं. आतां रात्र पडली आहे. पण तुला सांगतों, पहांटेचा कोंबडा आरवण्याचे पूर्वीच तूं लोकांस त्रिवार सांगशील कीं, 'येशूचा आणि माझा कांहीं संबंध नाहीं. येशूचा आणि माझा कांहीं संबंध नाहीं, येशूचा आणि माझा कांहीं संबंध नाहीं'. मजवर तुमचें जर कांहीं खरोखरी प्रेम असेल तर तुम्हीं माझ्या आज्ञा पाळा. मी आतां खास जातो. पण मी तुम्हांस दुःखांत सोडून जातों असें समजूं नका. शांतिब्रह्म मी तुम्हांसाठी ठेवून जात आहे; तें चित्तांत सांठवून ठेवा. मी गेलों म्हणून खिन्न होऊं नका, भयानें गांगरू नका. मी तुम्हांस सांगतों, मी आतां गेलो तरी पुन्हा परत येईन, तुमचें मजवर प्रेम आहेना? मग मी माझ्या पित्याकडे जात असतां तुम्हांस खिन्नता का यावी? मी द्राक्षाचा वेल आहे, आणि माझा बाप बागवान आहे. तुम्ही माझ्या शाखा आहां, तुम्ही माझ्यांत व मी तुम्हांत आहे. जो माझ्यांत राहील तोच फळ धरील; पण जो मीरूप बुंध्यापासून तुटून जाईल, तो वाळून जाईल. येथून पुढे मी तुम्हांस सेवक म्हणणार नाहीं. कारण धन्याच्या मनात काय आहे हें सेवकांस कधीं कळत नाहीं. पण मी तर माझें सर्वस्व तुम्हांस सांगून टाकिलें आहे कीं, तुम्ही एकमेकांवर प्रेम करा. म्हणून इतउत्तर तुम्ही माझे मित्र आहां'.
मग तो आपल्या शिष्यांबरोबर गेतसेमाने येथील बागांत आला. आपल्यावर संकटें सांचत चालली आहेत, अधिकारी चवताळले आहेत, बडवे, पुजारी, शास्त्री त्यांचे कान फुंकीत आहेत; या सर्व गोष्टी त्याचे कानीं भराभर येत होत्या आणि पाखांडी माणसाला सुळावर ठोकून मारतात हेंही त्यास माहीत होतें. त्यामुळे तो कांहींसा घाबरा झाला व
पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/९९
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९५
येशू ख्रिस्त