वाटेल म्हणून, त्यानें ती मुकाट्याने खाऊन टाकिली. ओपिअस नांवाच्या मित्राबरोबर रानांतून प्रवास करीत असतां त्यास एकदा एका खोपटांत मुक्कामास राहावें लागलें. तेथे पहातात तो एकच अंथरूण सांपडलें. पण ओपिअस थोडासा आजारी असल्यामुळे त्यानें तें ओपिअसला दिले व आपण स्वतः उघड्या भुईवरच निजला. वास्तविक या गोष्टींत विशेष कांहीं आहे असें नाहीं. पण कांहीं मोठ्या माणसांचे मोठेपण असल्या बारीक गोष्टीपर्यंतसुद्धां पोंचलेलें असतें इतके यावरून दिसून येते.
अशा या परम धीरोदात्त पुरुषाचा अंत नकळत जवळ आला. हा पुढें मागें राजा होणार ही हूल बद्धमूल झाली. भक्तांनीं दाखविलेला नैवेद्य विषवत् झाला. 'रोमन लोकसत्ता बुडणार' अशा खोट्या अफवा त्याच्या शत्रूंनी उठवून गुप्त कट आरंभिला. निकटचे मित्र तोंडदेखलें हंसून शत्रु बनले. 'तुमच्या जिवाविरुद्ध कांहीं कट चालू आहे; संभाळा' असे इशारे अनेक आले; पण त्यानें ते हंसण्यावारी नेले. आपणांस कोणी व कां मारावें हेंच त्यास कळेना. हुजरेसुद्धां तो बरोबर घेईना व कमरेची तलवारही जवळ बाळगीना. इतका निर्धास्त तो बनला. मार्चची १५ तारीख आली. त्या दिवशीं सेनेटची बैठक होती; म्हणून या सर्वाधिकाऱ्यास निमंत्रण आलें. मित्रांनी खाजगतांत सांगितलें कीं, 'जाऊं नका'. पण तें त्यानें मानिलें नाहीं. घरांतून बाहेर पडतांना त्याचा स्वतःचा पुतळा होता तो एकदम खाली रेलला. हें अशुभ झाले; पण तो थांबला नाहीं. सडकेनें एका हितचिंतकाने भवितव्याची चिठी हाती दिली ती त्यानें तशीच कुसकरून टाकिली. सेनेटमध्ये जातांच लबाड, कपटी, बदमाष, मानकापू पण वरवर हंसणाऱ्या अशा मित्रांनी त्याचें स्वागत केले. आणि तों स्थानापन्न होतांच त्या कटवाल्यांनी त्याच्या हातीं एक
पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/८१
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७७
जूलियस सीझर