डोळ्यांसारखे काळसर घारे होते आणि गर्दन मोठी वळीव व भरलेली दिसे. तो दिसण्यांत फिकट दिसे. दाढीमिशा काढावयाचीच त्याची पद्धत होती. डोक्यावरचे केसही आंखूड व पातळ असून शेवटीं शेवटी त्याच्या डोक्याला चांगलें टक्कल पडलें होतें. तें झांकण्यासाठीं डोक्यावर तो हार घाली. सभेंत बोलत असला म्हणजे त्याचा आवाज उंच झाल्यामुळे कर्कश बने. मरेतोंपर्यंत त्याची प्रकृति अगदीं खणखणीत राहिली होती. फक्त शेवटच्या वर्षी त्याला वाताचे झटके येऊ लागले होते. कोणी म्हणतात त्याला जन्मभर घुरें येत असे. त्याला आंघोळीस पाणी फार लागे. आणि एकंदरी सगळ्याच बाबतीत स्वच्छतेसंबंधीं तो फार खाराखिरी करी. जेवतांना चांगलें लागलें म्हणून उगाच अन्नावर ताव मारणें हें त्यानें कधींच केलें नाहीं. किंबहुना पानांत काय पडेल तें बिनतक्रार खावें हीच त्याची पद्धत होती. तो दारूला कधीं शिवलासुध्दां नाहीं. तरुणपण तो चांगला पहिलवानासारखा दिसे. सर्व मर्दानी खेळ खेळण्यांत तो बडा पटाईत असून घोड्यावर बसण्यांत तर चांगलाच वाकबगार होता. या घोड्याच्या बाबतीत तर तो इतका चिकित्सक असे कीं, त्यानें आपल्यासाठीं म्हणून एका चांगल्या अवलादीच्या घोड्याची पैदास केली होती व तो घोडाही इतर कोणाचा स्वारी स्वतःवर होऊ देत नसे. या घोड्याच्या पायाला गेळें होतें व म्हणून सीझरला यश मिळतें असें लोक समजत. अगदी लहानपणापासूनसुद्धां सीझरच्या सच्चेपणाबद्दल त्याच्या मित्रांची खात्री असे. कोणीं कुरापत काढली तरीसुद्धां भांडत बसण्याचा त्याचा स्वभावच नसे. चांगल्या कुलीन घराण्यांत वाढल्यामुळे त्याची नेहमींची वागणूक शांत, सभ्यपणाची व आदबशीर अशी असे. एकदां असें झालें कीं, तो कोठेंसा जेवावयास गेला असतां पानांत वाढावयाची फोडणी अगदीं करपून गेली होती. तरी आपणांस जेवावयास बोलविणारास आपण ती खाल्ली नाहीं तर वाईट
पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/८०
Appearance