मुलांस बोलाविलें आणि पोरासारखा गळा काढून तो रडूं लागला. तो तार्तरीच्या राजास म्हणाला, 'मला आतां ताराल काय?' खान खट्टू होऊन उद्गारला, 'हें कसें होईल? प्रसंग पोलंडच्या राजाशी आहे. त्याच्याशी टक्कर देणें आतां व्हावयाचें नाहीं. आतां काढता पाय घेऊं या'.
"हंगेरीची स्वारी सुरू करण्यासाठीं रिकिबीत पाय घालावयाच्या आधीं हें पत्र मी तुला लिहीत आहें. राजानें लिहावें आणि राणीनें वाचावें अशाच थाटाचें हें पत्र आहे ना? बव्हेरिआ आणि सॅक्सनी येथील मांडलिक मजबरोबर वाटेल तिकडे यावयास कबूल आहेत. मेलेलीं माणसें, उंट आणि घोडीं यांच्या दुर्गंधींतून तुर्कांच्या पाठीवर आम्हांस दौडत जावयाचें आहे."
तुर्कांची पांगापांग होऊन तळ ओस पडल्यावर सोबेस्कीनें व्हिएन्ना शहरांत प्रवेश केला. आपल्या पराक्रमी उपकारकर्त्याचें दर्शन होतांच त्या दीनावलेल्या प्रजेला अश्रूंचें भरतें आलें. हर्षनिर्भर होऊन त्यांनीं त्याचें स्वागत केलें व आनंदाच्या टाळ्यांनीं आणि आरोळ्यांनीं गांवचे रस्ते दणाणून सोडले. सर्व लोक शहरच्या मुख्य देवळांत जमले. त्या ठिकाणीं धर्मोपदेशकांनीं धर्मपुस्तकांतील एक आख्यान लाविलें. त्याचा आरंभही असाच होता:— 'मग परमेश्वरानें दयाळु होऊन एक त्राता पाठविला. त्याचें नांव जॉन'. वास्तविक बायबलांतील मूळचा जॉन हा निराळाच होता; पण हरिदासबुवांनीं त्या जॉनशीं हा जॉन मोठ्या खुबीने जुळवून घेतला. असो. सर्व शहराला हायसें झालें. आपणांस मारावयास आलेल्याचा तळ लुटावयाचें काम आतां त्यांना करावयाचें होतें. डिसेंबर ता. २३ ला हा बाजीराव व्हिएन्नाच्या छत्रसालाचा गजेंद्रमोक्ष आटोपून आपल्या क्रॅको शहरास परत आला.
सोबेस्कीच्या या विजयाची वार्ता सर्व युरोपभर झपाझप पसरली.
पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१८५
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८१
जॉन सोबेस्की