आहेत'. घोड्यांच्या पागा, शिकारीचे कुत्रे, मेजवान्यांसाठीं बांधलेले दिवाणखाने, सोन्यारुप्यांची ताटेंवाट्या, किनखाबी पडदे, गाणारांचे ताफे आणि एकंदरीनें जीवित सुखाचें बनविण्यास ज्या कांहीं बारीक- सारीक सोयी आपण उत्पन्न केल्या आहेत, त्यांचीसुद्धां त्यानें आपल्या घरांत समृद्धि केली होती. दरबारी व कांहीं विलासी असा जरी घरचा थाट होता तरी मुलांच्या शिक्षणासंबंधानें मात्र बाप सक्त काळजी घेई. त्यानें मुलांस कित्येक भाषा शिकविल्या. घोड्यावर बसणें, दांडपट्टा खेळणें ह्या विद्याही जॉननें उत्तम अभ्यासिल्या होत्या. त्याप्रमाणेंच कोणच्याही दिलेल्या विषयावर ताबडतोब वक्तृत्व करण्याचा सरावसुद्धां त्याला चांगला झाला होता. शिकार करण्यांतही हा मुलगा बांका होता. आई आणि मुलें एकत्र बसलीं म्हणजे आपला आजा तुर्कांशीं कसा लढला याचीं वर्णनें ती चांगलीं तिखट-मीठ लावून मुलांना सांगे. अर्थात् तुर्कांच्या हातून त्याचा प्रत्यक्षच घात झाला असल्यामुळे मुलांच्या मनांत तुर्कांविषयीं कायमची अढी बसून होती. सोबेस्कीस वाटे कीं, आपण मोठे केव्हां होऊं आणि आपल्या पोलंड देशाच्या जिवावर उठलेल्या ह्या तुर्कांचा नायनाट कसा करूं. शिक्षण पुरतें व्हावें म्हणून युरोपांतील चालीप्रमार्णे बापानें त्यास देशाटन करावयास पाठविलें. पॅरिस शहराकडून पोलंड देशांत सोबेस्की परत येतो तों तेथें बरीच बजबज माजली आहे असें त्यास दिसलें. इतिहासांत प्रसिद्ध असलेले जे कोसॅक लोक त्यांनी या वेळी रशियाचा पक्ष घेतला होता व बरोबर रशियन आणि तार्तार फौजा घेऊन ते मजल दरमजल पोलंड देशावर चाल करून येत होते. पोलंडचा राजा त्यांस आडवा झाला. दोन दिवसपर्यंत घनचक्कर लढाई झाल्यावर पोलिश फौजा किंचित् घाबऱ्या झाल्याचे दिसूं लागलें. राजानें आपल्या भीति खाल्लेल्या फौजांना थोपवून धरण्याची शिकस्त केली; पण जो तो रणमैदानांतून काढता
पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१७४
Appearance