आफ्रिकेंतल्या आडदांड मूरिश लोकांनासुद्धां त्याचा मोठा वचक बसून राहिला होता.
एकदां असें झालें कीं, वेनिश शहरचीं कांहीं गलबतें फ्लॅन्डर्स देशांतून आपल्या देशाकडे परत जात होतीं. गलबतावर मोठ्या मोलवान् चिजा भरल्या होत्या. हीं जहाजें पोर्तुगाल देशच्या किनाऱ्यानें सुखानें चाललीं असतां या दोघांनीं त्यांच्यावर अचानक हल्ला केला. जहाजावरचे लोकही भले खंबीर भांडखोर होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सारखी मारामारी चालली. दोघांचेही माणूस फार मेलें, जहाजाला जहाज भिडून हाणाहाणी चालली असतां कोलंबस ज्या जहाजावर होता त्यानें पेट घेतला. ह्यांनीं व त्यांनी आपापली निरनिराळी जहाजें साखळदंडाने एकमेकांस बांधून घातलीं होतीं व शत्रूचीं जहाजें अगदीं टेकल्यावर त्यांवर उड्या टाकून भांडावयास सांपडावें म्हणून त्यांची जहाजेंही आपल्या जहाजांस त्यांनी साखळ्यांनी गुंतविली. त्यामुळे असें झालें कीं, एक जहाज पेटतांच भोवतालचीं सर्व पेटलीं. होतां होतां दोन्ही- कडील सगळींच जहाजें पेटून एकच डोंबाळा माजला. आतां जहाजे सोडवितां येत नाहींत हें पाहून पटाईत पोहणारांनी बेलाशक समुद्रांत उड्या झोंकून दिल्या. कोलंबसानेही तेच केलें. पाण्यांत पडल्यावर त्याला एक वांसा सांपडला. त्याला धरून कोलंबस किनाऱ्याकडे पोहत जाऊं लागला. किनारा जवळपास सहा मैल होता. तरी कोलंबस पोहण्याच्या कामांतही चांगला निष्णात असल्यामुळें तो लवकरच पोर्तुगाल देशच्या किनाऱ्यास येऊन लागला. म्हणजे जिनोआ शहरचा हा दर्यावर्दी रहिवासी आपल्या चांचेगिरीच्या धंद्यानिमित्त समुद्रावर फिरत असतां एका मोठ्या अरिष्टांतून निभावून कोठल्यातरी एका देशाच्या अनोळखी किनाऱ्यावर येऊन पडला. याच पोर्तुगाल देशांत त्याच्या कल्पना वाढत जावयाच्या होत्या. कोणाकोणाचें असें म्हणणें आहे कीं, त्याचें पोर्तुगाल देशांत येणें
पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१२५
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२१
कोलंबस