त्याला लहानपणच्या चुकांमुळें प्राप्त झाली. गांवच्या शाळेतील पंतोजी मोठा खाष्ट असून लिहिणें, वाचणे, आणि थोडें जुजबी लॅटिन याच्यापलीकडे जरी फिरकत नसला तरी तो असल्या धड्यांपायींच पोरांना बेदम मारीत असे. लूथरलाही त्याच्या हातचा प्रसाद पुष्कळदां मिळत असे. या पंतोजींची पुंजी संपल्यानंतर बापानें त्यास दुसऱ्या एका शाळेत घातलें. पण तेथें तो एक वर्षच राहिला कारण यापुढें बापाला खर्चाचे झेंपेना. बाप कडक असला तरी मुलाला 'बाबां'ची आवड फार. पण कांहीं झालें तरी शिकणें हे प्राप्तच आहे, हें पाहून बापाने आपल्या पंधरा वर्षाच्या मुलास आपल्यापासून दूर केलें. इसेनास गांवीं त्याची रवानगी करण्यांत आली. तेथें त्याला नादारी मिळाली आणि त्याच्या जेवणा- खाण्याचीही सोय झाली. लूथरने शिक्षणासाठीं हें दैन्य पतकरलें. लूथरचा आवाज गोड होता. कोणाला पदें म्हणून दाखवावीं आणि चार दोन आणे मिळवावे असेंही त्यास करावें लागे. पण या वाईटांतून एक चांगले निघालें. कोटा नांवाच्या एका श्रीमान् स्त्रीला या मुलाचा केविलवाणा आणि गोड स्वर फार आवडल्यामुळे ती त्याला थोडीबहुत मदत करूं लागली आणि तिच्याच घरीं खानदानीच्या व सुसंस्कृत अशा माणसांच्या चालीरीति लूथर यास माहीत झाल्या. या गांवीं लूथरने चार वर्षे शिक्षण घेतलें.
इ० सन १५०१ सालीं लूथर मॅट्रिक्युलेट झाला. हा वेळपर्यंत बापाची सांपत्तिक स्थिति चांगली सुधारली होती. व आजपर्यंत आपल्या मुलाचे हाल झाले ते झाले, आता त्याला पदरखर्चानें कॉलेजांत घालावयाचें असें ठरवून त्यानें त्यास एरफूर्ट शहरी पाठविलें. तेथील विद्यापीठाचा लौकिक सर्व जर्मनींत मोठा होता. शिकविणारेही चांगले जाडे पंडित असत. तर्क, न्याय, तत्वज्ञान, अलंकार, खगोलविद्या इत्यादींचा अभ्यास लूथरने या ठिकाण केला. ग्रीक,
पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१०४
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुरुषश्रेष्ठ
१००