Jump to content

पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुरुषश्रेष्ठ
९६
 

शिष्यांस म्हणाला, 'येथें माझ्या भोंवतीं जागे रहा'. पण रात्र पडली आणि शिष्यांना झोंपेनें ग्रासलें. तो म्हणाला. 'तुम्हांस थोडें जागवत नाहीं काय?' थोडक्याच वेळांत ते सर्व झोपी गेले. येशू निराशेनें म्हणाला, 'आतां खुशाल निजा. माझी घटका भरली. परमेश्वराच्या पुत्राचा विश्वासघात झाला. लबाडांनीं त्याला पातक्यांच्या हाती लोटलें'. इतकें तो बोलत आहे तोंच बुचकळलेला तुकडा स्वीकारणारा यहुदा व नागव्या तलवारी घेतलेले शेंकडों लोक आणि धर्मोपदेशक तेथें जमा झाले. तेव्हां येशू त्यांस तडफेनें म्हणाला, 'असे चोरासारखे रात्रीचे कां आलां? मी रोजच्या रोज तुमच्यादेखत प्रतिपादन करीत होतों ना?' त्यांनीं एकदम येशूस धरिलें. इतक्यांत येशूच्या लोकांपैकीं एकानें तलवार उपसली आणि मुख्य धर्मगुरूच्या एका चाकराचा कान कापला. येशू शिष्यास म्हणाला, 'तलवार चालवू नको. जे तलवार चालवितात ते तलवारीनेंच मरतात'. त्यास पेंचांत धरण्यासाठीं धर्मगुरूंनीं बरोबर साक्षीदार आणले होते. एकजण म्हणाला, 'येशू म्हणाला कीं, मी हें देऊळ पाडीन व तीन दिवसांत पुन्हा उभें करीन' 'तूं असें म्हणालास काय?' असें धर्मगुरूनें विचारिलें असतां येशू गप्पच राहिला. पुन्हा त्यानें विचारलें, 'तूं ख्रिस्त आहेस, नाहीं? तूं परमेश्वराचा पुत्र आहेस, नाहीं?' येशू गंभीर आवाजानें म्हणाला कीं, "होय. मीच तो आहें'. तेव्हां त्यांनीं त्याचे कपडे फाडिले, हा पाखंडी आहे असें ते म्हणाले, ते त्याच्या तोंडावर थुंकले आणि त्यांनी त्याला चपराका मारिल्या. हें होत असतां त्याचा आवडता शिष्य सायमन बाहेर बसला होता त्यास कोणी म्हणाले, 'तूंही त्याच्यापैकीच आहेस'. जणुं आपण त्या गांवचे नव्हों अशा स्वरानें सायमन तीनदां म्हणाला, 'जीजस माझा कोणी नव्हे!' त्यानें हें उत्तर करतांच कोंबड्यानें सांथ घातली. येशूचें भाकित खरें झालें. त्याच्या शिष्यां