पान:पायवाट (Payvat).pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लाच हवा, व तोच अजून झालेला दिसत नाही हे खरे आहे. पण ही भूमिका या प्रश्नाच गाभा स्पर्शू शकत नाही. कारण वाङ्मयाच्या कक्षा रुंद होणे, जीवनाचे विविध थर त्यात चित्रित होणे इत्यादी क्रिया कितीही महत्त्वाच्या असल्या, तरी या जीवनदर्शनाच्या क्रिया आहेत. सामाजिकदृष्टया प्रक्षोभक वाङ्मय निर्माण करणारी प्रतिभा ही दर्शन घडविणारी प्रतिभा नसते. यथातथ्य दर्शन घडविणे हा या प्रतिभाशक्तीचा फक्त एक भाग असतो. ती प्रतिभा भाष्य करणारी, संगती लावणारी, निरूपणात्मक प्रतिभा असणे आवश्यक आहे. दर्शनी पृष्ठभागावर जे तरंगताना दिसते, त्याच्या मागे जाऊन अंतःप्रवाह हुडकण्याचा प्रयत्न करणारी अशी ही प्रतिभा असते. वाङ्मयीन दृष्टीने जेव्हा आपण आजचे वाङ्मय पुरेसे व्यापक नाही असे म्हणतो, त्याचा अवाङ्मयीन सोपा अर्थ काय आहे?
 समाजाच्या विविध थरांतून अजून लेखक पुढे आलेले नाहीत, असा याचा अर्थ आहे. समाजाच्या सर्व थरांतून जेव्हा लेखक उदयाला येतील, जीवनाच्या विविध उद्योगकक्षांतून जेव्हा लेखक उदित होतील व आपापले अनुभव मांडू लागतील, तेव्हा वाङ्मयाच्या कक्षा रुंदावतीलच. अपेक्षित असणाऱ्या पुरेशा facts त्यावेळी गोळा होतील. वरिष्ठ मध्यमवर्गीय लेखकांनी निर्माण केलेले आजचे वाङ्मय प्रामुख्याने ब्राह्मणी वाङ्मय आहे. जोपर्यंत आदिवासी, गिरिजन, हरिजन, बहुजनसमाजातून लेखक जन्माला येत नाहीत, तोपर्यंत हे वाङ्मय असेच दुबळे व व्यक्तिवादी राहणार असा हा मुद्दा आहे. कुणी सौम्यपणे, कुणी कटोरपणे प्रकृतिधर्मानुसार हा मुद्दा मांडून जातो. भाषेचे मूलभूत स्वरूप बोलीचे असते. समाजाच्या विविध थरांतून नवे लेखक उदयाला येतील तसतसे बोली-भाषेतील शब्द वाङ्मयात अधिक प्रमाणात येऊ लागतील. बोलीमध्ये असणारे अनेक वाक्प्रचार, शब्द व म्हणी यांची देणगी मराठी भाषेला मिळून भाषेची श्रीमंती अजून वाढेल. हे बोलीतील धन भाषेच्या स्वाधीन होणे अगत्याचे आहे, हेही मला मान्य आहे. दादासाहेब रूपवते म्हणाले, 'फाशी देणे' याही शब्दप्रयोगाला निरनिराळ्या अर्थच्छटा आहेत. 'फाशी' हे एका माशाचे नाव आहे, याचा उल्लेख करून 'ह्याला फाशी द्या' ह्या वाक्याचा गैरसमज करून दाखविता येईल, एक नवीन विनोद निर्माण होईल. रूपवते यांचे म्हणणे मला मान्य आहे. या सगळ्यांमुळे वाङ्मयातील विविधता वाढेल, भाषेची संपन्नता वाढेल. पण वाङ्मय सामाजिकदृष्ट्या प्रक्षोभक होण्याला हे सगळे उपयोगी होईल का? होईलसे मला वाटत नाही.

 मराठी वाङ्मयाची परिस्थिती आज झपाट्याने पालटत आहे. अजूनही बहुतेक लेखक वरिष्ठ जातीचे आहेत, मध्यमवर्गीय आहेत हे खरे असले, तरी नवे लेखक पुढे येत आहेत. बोराडे, शंकर पाटील, बाजीराव पाटील यांच्यासारखे किंवा शंकरराव खरात, अण्णाभाऊ साठे, यांच्यासारखे नवे लेखक क्रमाने उदयाला येत आहेत. पण हे जे नवे लेखक बहुजनसमाजातून, दलित वर्गातून निर्माण होत आहेत, त्यांचे वाङ्मय तरी त्यांच्यास्वतःच्या जीवनाचे चित्रण करणारे आहे का ? ठोकळ आणि दिघे यांची ग्रामीण कादंबरी

आजचे मराठी साहित्य सामाजिकदृष्ट्या पुरेसे प्रक्षोभक आहे काय ? ९३