पान:पायवाट (Payvat).pdf/5

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


हा मतभेद एका विशिष्ट भूमिकेशी असणारा मतभेद आहे. संपूर्ण जीवनवादी समीक्षापद्धतीशी मतभेद नाही, ही बाब वाचकांना स्पष्ट होईलच.
 वेळोवेळी माझ्याकडून हे लिखाण लिहून घेणारे आणि प्रकाशित करणारे माझे मित्र यांचा मी कृतज्ञ आहेच. या लिखाणाला संग्रहित करण्याची जबाबदारी श्री. केशवराव कोठावळे यांनी घेतली. त्यांचा मी आभारी आहे.
 या संग्रहाची मुद्रणप्रत माझे मित्र प्रा. मधुकर राहेगावकर यांनी केली, याबद्दल त्यांचाही मी आभारी आहे.
 अनेकांच्या अनेकविध ऋणांवर मी उभा असतो. ही सारी ऋणे फक्त एका कारणासाठी सुसह्य होतात. ते कारण म्हणजे आपण जो उद्योग करतो आहो याला काही अर्थ आहे. खरोखरच असा काही अर्थ या उद्योगाला आहे काय? याचा निर्णय वाचकांनी दिला पाहिजे. आणि तो विनतक्रार आपण मान्य केला पाहिजे. माझी याला नेहमीच सिद्धता असते.
 

नरहर कुरुंदकर