पान:पायवाट (Payvat).pdf/45

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एक संपूर्ण व स्वयंपूर्ण अनुभव एकघन अवस्थेत व्यक्त करण्यात कलावंताला यश मिळते की नाही हाच केव्हाही झाले तरी खरा महत्त्वाचा प्रश्न असतो.

 गोडसे यांच्या भूमिकेवर अन्याय व्हावा अशी कोणतीही टीका करण्याची गरज नाही. पण त्यांनी केलेली मांडणी अतिशय ठिसूळ आहे हे मात्र सांगितले पाहिजे. पट आणि कलाकृती यांची तुलना करताना गोडसे नेहमी यंत्रणा हा शब्द वापरीत असतात. ही यंत्रणा कापडाच्या बाबतीत आपण 'चाती व माग' म्हणू. दोन्हींचा मिळून एक 'साचा' असे म्हणता येईल. जीवनाच्या विकासक्रमात हा साचा नेहमी विकसित होत असतो. तलम, अधिक तलम, या मार्गाने अगर घट्ट व टिकाऊ, अधिक घट्ट व टिकाऊ या मार्गाने सतत हा.विकास चालू राहतो. या यंत्रणेतील होणारा प्रत्येक विकास कमी खर्चात जास्त उत्पादन करणारा अगर कमी काळात जास्त उत्पादन करणारा किंवा तेवढ्याच काळात अधिक दर्जेदार उत्पादन करणारा असा असतो. कालानुक्रमात शतकेच्या शतके विकास न होतासुद्धा ही यंत्रणा पडून राहील. एखाद्या कालखंडात विकासाची गती वाढेल किंवा ही सारी यंत्रणाच विस्मृत होऊन जाईल. ही यंत्रणा स्थिर असते, विकसित होते, किंवा विस्मृत होते. पण तिचा -हास होऊ शकत नाही. मांगाचा हेतू कापडाचे उत्पादन हाच असतो. या हेतूवर मात करणारी कोणतीही तांत्रिक प्रगती शक्य नसते. किंवा या यंत्रणेला विलगीकरणही नसते. कलांच्या बाबतीत -हासाचे कालखंड असतात, तसे विकासाचे असतात. मूळ हेतूवर मात करणाऱ्या अवस्थेतही ही यंत्रणा जाऊ शकते. हा फरक लक्षात न घेता पट व कलाकृतो यांची तुलना करण्यात अर्थ नसतो. जसा कापूस तसे कापड, जसा पीळ व धागा तसे कापड, असे आपण म्हणू शकतो. कारण कापडात नवनिर्मिती नसते. एकाच जातीच्या कापसापासून एकाच दर्जाचे कापड करणे हा यंत्रणेचा नित्य उद्योग असतो. कलांच्या बाबतीत हे शक्य नाही. एकाच कालखंडात नरेंद्र व दामोधर येतात, दोघांच्याही जीवनाच्या निष्ठा त्याच आहेत. पण दोघांच्या साहित्यकृतींत दर्जाचा फरक पडतो. एकाच कालखंडातील सारे कलावंत एकाच दर्जाचे असू शकणार नाहीत. गोडसे ज्या पद्धतीने तुलना करतात, त्यामुळे ही मूलभूत बाबच नजरेआड होते.

 समीक्षेचे मुख्य कार्य एखादी आकृती कलाकृती केव्हा होते हे सांगण्याचे असते. हे सांगण्याला जे विवेचन उपयोगी पडते त्यालाच समीक्षाशास्त्राचे विवेचन असे म्हणता येईल. इतर विवेचन कलामीमांसेला अप्रस्तुत आहे. जे लोक विसाव्या शतकात असतील त्यांच्या वाङ्मयात विसावे शतक दिसणारच. पण यामुळे ते वाङ्मय ललित साहित्यकृती आहे की नाही हे सांगणे शक्य होत नाही. कोणतीही कलाकृती जरी तपासली तरी या तपासामुळे ती कलाकृती ज्या कालखंडात निर्माण झाली त्याविषयीच्या माहितीचे धागेदोरे सापडतात. ही अशी तपासणी करणे कलाकृती समजून घेण्यासाठी उपकारकही असते. पण त्यामुळे समीक्षेतील मूलभूत आद्य प्रश्नाला उत्तर मिळत नाही ते नाहीच. त्याप कालखंडात जीवन निर्जीव व पोकळ बडेजावाने भरलेले असते, त्याही कालान्यता दिली.

पोत ३९