पान:पायवाट (Payvat).pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समृद्धीचे अंतर आहे. ते अंतर केवळ अनुभवाच्या जिवंतपणावर कवितेचे अस्तित्व टिकविण्याच्या प्रवृत्तीतील अंतर नाही. 'ना घर होते ना गणगोत चालेन तेवढी पायाखालची जमीन होती' या ठिकाणाहून ही कविता सुरू होते आणि उद्ध्वस्त नगरात काहीसे हरवलेले शोधीत परतलेला सैनिक हिंडावा त्याप्रमाणे हिंडते. हा शोध प्रामुख्याने चेहरे वाचण्याचा शोध आहे. कधी दोन घेत, कधी दोन देत, पण मोडून न पडता जी वाटचाल चाललेली आहे त्या वाटचालीचा हा एक आलेख आहे. ही वाटचाल चालू असताना काळोख कोरीत जीव जळत राहतो हेही खरे आहे. आणि नवी स्वप्ने डोळ्यांना दिसतात हेही खरे आहे. सुळेंच्या भाषेत सांगायचे तर ही कविता खुंटीवर स्वप्ने टांगून मान मोडून काम करणाऱ्या वास्तवाच्या नावाने आणि व्यथांच्या नावाने पुकारलेला एक जाहीरनामा आहे.

प्रतिष्ठान, सेप्टेंबर १९६९

१४० पायवाट