(९१) या विपाकाच्या विरुद्धवासनांची अभिव्यक्ती होत नाहीं. देवख प्राप्तिसमयांत नरक भोग वासना चित्तांत लीनच असतात कारण त्यांचीही यासमयीं अभि- व्यक्ती होईल तर दिव्य भोग होण्याचा असंभव होईल असे तात्पर्य आहे. ॥ ८ ॥ 'आतां स्वर्गदेशांत देवजन्मामध्ये दिव्य भोगापासून झालेल्या ज्या वासना सा मनुष्य व्याघ्रादि सहस्र जन्मांच्या व्यवधानानंतर पुनः देवजन्म प्राप्त होईल तेव्हां अभिव्यक्त होतात परंतु अव्यवहित पूर्वजन्मांतील वासनाच पूर्वदिनवास- नांसारख्या कां अभिव्यक्त होत नाहींत अशी शंका येते ह्मणून सांगतात. || जातिदेशकालव्यवहितानामप्यानंतर्यैस्मृतिसंस्कारयोरे करूपत्वात् ॥ ९ ॥ जरी बहुतकरून निजून उठलेल्या मनुष्याला अव्यवहित पूर्व दिनानुभवापासून झालेल्या वासनाच व्यवधान नसल्याने अभिव्यक्त होतात तथापि ह्या अनादि- संसारामध्ये ज्या जन्मांत ज्या कर्माने केलेल्या भोगानीं वासना संचित झाल्या सा कोटिजन्मानी ह्या लोकापासून परलोकपर्यंत माहादेशाने किंवा शंभर कल्पानीं व्यवहित असल्या तरी याप्रकारच्या कमौनी तें जन्म पुनः प्राप्त झाले असतां याच कर्मानी अथवा जन्मानीं अभिव्यक्त होतात त्यांस आनंतर्य ह्मणजे अव्यवहितव स्मृतींच्या द्वारानें भोगादिसाधनस तें असतें, कारण विल- क्षण कर्मीपासून झालेले जे प्रकृतजन्म याच्या अव्यवहित पूर्वजन्मांतील वासना ह्मणजे संस्कार सांची उद्घोधक कोणी नसल्यानें प्रसुप्ति ह्मणजे अव्यक्तताच असते. कर्म व जन्म हीं जर वासनांचीं उद्धोधर्के असली तर त्या व्यवहित असल्या तरी त्यांची अभिव्यक्ती होते हैं युक्तच आहे. आतां पूर्वजन्मांतील वासना विजातीय असल्या तरी अव्यवधान आहे ह्मणून साच स्मरणादिकां- करितां कर्म व जन्म ह्यांनी उद्बुद्ध होतील असे ह्मणूं नये कारण स्मृति व संस्कार हे दोन्ही एकरूपच आहेत याचा अर्थ असा की क्रिया, ज्ञान, किंवा आणि क कांहीं रागादिक त्यांच्या बीजभावानें चित्तस्थित जो असतो तो संस्कार तो आ- पल्यातुल्य विषयक ज्ञान किंवा क्रियेच्या स्मरणादिकाचा कारण होतो. किया- संस्कार क्रियारूपानें परिणत होतो. ज्ञानसंस्कार स्मृतिरूपानें परिणत होतो. अन्यवस्तुसंस्कार त्या रूपानें परिणत होतात ह्यामकारें स्मृति व संस्कार यांचें तादात्म्य व एकविषयकत्व या दोन्ही प्रकारानी एकरूपता होते आनंतर्य श ब्दा कार्यकारणभाव बोधित होतो तो विजातीयांचा संभवत नाही कारण ला व्यवधान जें ते विरूपकार्यकारित्वाचे आपादन करीत नाहीं जर क तर घटानुभव जनित संस्कारानंतर दुसरे संस्काराचें व्यवधान झालें असतां नभूत वस्तूंच्या स्मरणाची आपत्ती येईल. ॥ ९ ॥
पान:पातंजल योगदर्शन.pdf/९९
Appearance