( ८५ ) भोजन केलें अशा वाक्यानें सर्वव्यंजन प्रकारांशीं सह भोजन केले असे जाणलें जाते. तसे पुनः भोजनपात्रांत स्थित सर्वव्यंजनांनी युक्त सर्वअन्न भक्षिलें अशा- वाक्यानें भक्ष्याच्या स्वरूपाने व प्रकाराने निःशेष भक्षिलें असें जाणले जाते. याममाणे हे क्षणसंयमापासून झालेले विवेकज्ञान सर्ववस्तूंच्या स्वरूपाला विषय करिर्ते व सर्व प्रकारांला विषय करितें. कारण, हे प्रकृतीपासून विविक्त असा जो पुरुष साला विषय करणार आहे हे संसारसमुद्रापासून पुरुषाला तारतें ह्मणून याचें तारक असे अन्वर्थ नाम आहे. अक्रम ह्मणजे क्रम सोडून एकदम हातावर ठेविल्या आंवळ्यासारखें सर्ववस्तूंचें समूहालंबनात्मक असें तें होतें. ॥ ५४ ॥ ह्या प्रकारें त्रिवेकख्यातीच्या शेवटच्या अवधीपर्यंत त्या त्या विभूती आहेत फले ज्यांचीं असे संयम सांगून तसा विवेकख्यातीचा परमावधी हो किंवा न हो प्रकृति व पुरुष यांचा साक्षात्कारच केवल मुक्तीचें साधन होऊं शकतो ह्या अभिप्रायानें सांगतात. || सत्वपुरुषयोःशुद्धिसाम्येकैवल्य मिति ॥ ५५ ॥ संपूर्ण रजोमल गेला आहे ज्यापासून अशा बुद्धिसत्वाची, विवेकख्याति करू- न संस्कार मात्र अवशिष्ट ज्यांत असे झाल्याने या बुद्धिसत्वाच्याठायीं सर्ववृत्तींची शून्यता ही शुद्धि. पुरुष वस्तुतः नित्यशुद्ध आहे तरी त्याकाली त्याला कल्पित भोगाची ही निवृत्ति होते हीच त्याची शुद्धि जाणावी. ह्यामकारें त्या दोषांच्या शुद्धीची समता झाली असतां मोक्ष होतो. या या सिद्धी केवल विश्वास उत्पन्न होण्याकरितां सांगितल्या आहेत मोक्षतर बुद्धिहून विविक्त अशा पुरुषाच्या सा- क्षात्कारमात्रानें अविद्यानिवृत्ती झाली असतां भावि दुःखाचा अनुत्पत्तिरूप असा सिद्ध होतो ॥५५॥ इति पातंजले सांख्य प्रवचने विभूति निर्देशो नाम तृतीयः पादः ६५ अज्ञान हे गाढांधकारासारिखे आहे. इंद्रियजन्य प्रत्यक्षादि ज्ञानदीपासारिखें आहे व विवेकजन्य ज्ञान सूर्यासारिखें आहे असे विज्ञा ० .
पान:पातंजल योगदर्शन.pdf/९३
Appearance