Jump to content

पान:पातंजल योगदर्शन.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ८४ ) अनेक क्षणांचा समुदाय युगपत् वस्तुरूप असा संभवत नाहीं. यांत हा क्षण साक्षणाहून पहिला, हा दुसरा असे क्षणांच्या व यांच्या पौर्वापर्यरूपक्रमाच्या संयमेकरून अति सूक्ष्म वस्तूंच्या भेदाचा साक्षात्कार ह्मणजे विवेकज्ञान होतें तेणेंकरून एककाळीं आकाशादि पुरुषपर्यंतांचें ज्ञान प्रत्यक्षात्मक होतें. हे क्षणसंयमापासून झालेले ज्ञान सर्व वस्तुविषयक होते असे पुढे सांगावयाचें आहे ॥ ५२ ॥ आतां त्या संयमाचा कांही सूक्ष्मविषय सांगतात. ॥ जातिलक्षणदेशैरन्यतानवच्छेदात्तुल्पयोस्ततः प्रतिपत्तिः ॥ ५३ ।। अवच्छेद ह्मणजे निचय. लोकांमध्ये पदार्थाच्या भेदाच्या निश्चयाला तीन कारण आहेत. त्यांत देश ह्मणजे अवयवीचा परिमित प्रदेश व लक्षण ह्मणजे शुक्लादिगुण तींहींकरून तुल्यरूप जे गौ आणि गवय ह्यांची गोल व गवयस ह्या जातीकरून भेदबुद्धि होते. देश व जाति या दोन्हीकरून तुल्य असे जे दोन गौ यांची भेद- बुद्धी कृष्णश्वेतादि लक्षणेकरून होते. जाति व लक्षण ह्या दोन्हींकरून तुल्य दोन आंवळे यांत एक आलिकडचे देशांत ठेवला व दुसरा पलीकडे ठेविला यांचा भेदनिश्चय देशभेदानें होतो. जेव्हां कोणीपुरुषानें योगीच्या ज्ञानाच्या परीक्षेक- रितां अलीकडचा आंवळा पलीकडच्या आंवळ्याच्या देशांत ठेवून योगी अन्य वस्तूच्याठार्थी व्यासक्तचित्त असतां पलीकडच्या देशांतला पहिला ठेविलेला आंवळा उचलून लपवून ठेवील तेव्हां ते दोन्ही आंवळे आमलकल जातिरूप परिमाणादिक लक्षणेकरून व देशेंकरून तुल्य असे असल्याने या दोन्ही आंव- ळ्यांचा जासादिकेंकरून भेदनिश्चय होण्याचा असंभव असला तरी योगीला क्ष- णतत्क्रमांच्या संयमापासून उत्पन्न झालेल्या विवेकज्ञानानेंच भेदाचा निश्चय होतो. ज्याक्षणीं अलिकडचा आंवळा पलीकडे ठेविला या क्षणाहून पूर्वी झालेल्या क्षणा- मध्ये सा आंवळ्यावर पूर्वदेशस्थवात्मिका पहिली परिणामाची परंपरा झाली. पूर्वीपासून पलीकडच्या आवळ्यांत ती झाली नाहीं कारण, साच्याठायीं या क्ष- णामध्ये उत्तरदेशस्थलरूप परिणामाची परंपरा होती ह्मणून क्षण व सांच्या क्रमांचा जाणणारा योगी या दोन्ही आंवळ्यांच्या पूर्वोत्तरस्थवरूप परिणामा- च्या परंपरेच्या क्षणांहून पलीकडे आणण्याच्या क्षणाचें आनंतर्य जाणत होत्साता आतां हा आंवळा पलीकडे आहे. पूर्वी अलीकडे होता पलीकडे नव्हता. अशा भेदाचा निश्चय करितो ।। ५३ ।। तारकंसर्व विषयं सर्वथाविषयमक्रमंचेतिविवेकजंज्ञानम् ॥ ५४ ॥ पूर्वी जी या या संयमकरून सर्वज्ञता सांगितली ती केवळ वस्तूंच्या सर्व भेदा ला मात्र विषय करणारी आहे. जसे पाकगृहांत शिजलेल्या सर्व व्यंजनांशींसा