(८०) स्थूलस्वरूपसूक्ष्मान्वयार्थवत्व संयमाहूतजयः ॥ ४४ ॥ आकाशादि पंचभूतांचा जो अवयव रचनाविशेष तो पृथिवीत्व द्रव्यत्वादि जातियुक्त होऊन स्थूलरूप दिसतो, तो कमेंकरून, शब्दस्पर्शादिकांतील एकैक गुणानें हीन जे स्थूल शब्दादिक पांच गुण त्यांणी युक्त असा भासतो हैं एक भू- तांचें स्थूल स्वरूप जाणावें. त्या पृथिव्यादि पंचभूतांचें स्वरूप, क्रमे- करून कठिनता, स्नेह, उष्णता, प्रेरणा, आणि सर्ववस्तुसंगत्वरूप में विभुत हैं सर्व दुसरे जाणावें. प्रेरणा ह्मणजे वायूनें केलेले तुणादिकांचे उत्सारण, सूक्ष्का- रण ह्मणजे परमाणु व यांचीं सूक्ष्म कारण शब्दादि पंचतन्मात्रें है तिसरें भू- तांचें सूक्ष्मरूप जाणावें. सखादिगुणत्रय है कार्यात स्वनिष्ठकारणतासंबंधाने अन्वि त होतें ह्मणून त्या त्रपाला अन्वय अर्से ह्मणतात व सर्वकार्यात साधारण कारण ह्मणून सामान्य ह्मणतात. ते चतुर्थ रूप जाणावें. आतां पंचमहाभूतांचें रूप अर्थवख ह्मणजे पुरुषाला भोग व अपवर्ग देण्याचें सामर्थ्य तें सवादिगुण निष्ट आहे, गुणांच्या संबंधानें भूतत आहे ह्या प्रकारेकरून भूतांचीं पांच रूपें कार्यात्मक स्वरूपात्मक, व हतुरूप अशीं आहेत सांच्या ठायीं स्थूलादिकमेंक- रून संयम केल्यानें पृथिव्यादि पंचभूतें जीतीं, वत्साच्या अनुसारें गाईप्रमाणे योगिसंकल्पाच्या अनुसारें परिणत होतात ॥ ४४ ॥ ततोऽणिमादिप्रादुर्भावः कायसंपत्तद्धर्मानभिघातच ॥ ४५ ॥ भूत जयेकरून योग्याला अणिमादिक अष्ट सिद्धी प्राप्त होतात. परमाणू- सारिखें सूक्ष्मरूप होर्णे ती अणिमासिद्धि जाणावी. सर्ववस्तुसंयोगित्वरूप जें विभुत्व तां महिमासिद्धि. कापुसाच्या गोळ्यासारिखा हलकेपणा ती लघिमासिद्धि. मेरुपर्वतासारिखा भारीपणा ती गरिमा. अंगुलीने चंद्रमंडलाला स्पर्श करणें ही प्राप्ति. सत्यसंकल्पत्व ह्मणजे मुखांतून निवाल्याप्रमाणें अर्थसिद्धि होणें तें प्राका म्य. सर्वप्राण्यांचे नियंतृत्व तें वशित्व. सर्वभूतांच्या उत्पादनाची शक्ति तें ईशिव. अशी हीं आठ ऐश्वर्ये आहेत. ह्यांत प्राप्तिपर्यंत स्थूल संयमानें सिद्ध होतात. स्व- ६३ आकृति, गुरुत्व, रूक्षपणा, आच्छादनकरणें, स्थिरता, भिन्नभिन्न प्रकारचीस्थिति, क्षमा, काळेपणा, कठिनता, व सर्वप्राणिभोगयोग्यता हे भूमीचे गुण आहेत. स्नेह, सूक्ष्मत्व, ( विरलता) प्रभा, शुक्लत्व, मृदुत्व, गुरुत्व, शैव्य, रक्षणशक्ति, पवित्रत्व, व संधिकरणे हे जलाचें- गुण आहेत. ऊर्ध्वगति पचनशक्ति, दहनशक्ति, पवित्रकरणें, लघुत्व, प्रभातमाचा ध्वंस- नाची शक्ति व प्रकाश हे ते जाचे गुण आहेत, वक्रगति, पवित्रपणा, दूरोत्सारण, प्रेरण, बल, चांचल्य, रूपराहित्य, रूक्षता है वायूचे धर्म आहेत, सर्वत्रव्याप्ति, संधीभाव नहोणें व कोणाचा ही प्रतिबंध नसणे हे तीन आकाशाचे गुण आहेत असे विज्ञा०
पान:पातंजल योगदर्शन.pdf/८८
Appearance