( ७८ ) अशा सिद्धीन युक्त झालेला योगी कृतकृत्य झाला आशी शंका येईल ह्मणून सांगतात. तेसमाधाबुपसर्गाव्युत्थानेसिद्धयः ॥ ३७ ॥ ते प्रातिभ ज्ञानादिक पूर्वोक्त सिद्धिरूप पदार्थजेते, मोक्षफलक समाधीच्या ठायीं तत्पर झालेल्या योग्याला उपसर्ग ह्मणजे विघ्न होतात. ह्मणून मुमुक्षु सांचा तिरस्कार करितो. कारण आत्मसाक्षात्कारावाचून कोटिशः सिद्धी असल्या तरी कृतकृसता होत नाही. हेच परमगुरु श्रीकृष्णांनीं गीर्तेत सांगितले आहे कीं, हे अर्जुना हें आत्मतस जाणूनच ज्ञानी होतो. सिद्धी ज्या आहेत त्या व्युत्थानदशें- त रमण करणाऱ्या अपूर्ण योग्याला प्रिय होतात ॥ ३७ ॥ ह्या प्रकारेंकरून आत्मसाक्षात्कारपर्यंत संयमाची ज्ञानरूपा विभूति सांगून क्रियारूप विभूति सांगतात. बंधकारण शैथिल्यात्प्रचारसंवेदनाच्चचित्तस्य परशरीरावेशः॥ ३८॥ सर्वप्रदेशांत व्याप्त होणे असा स्वभाव ज्या चित्ताचा त्याची आपले शरीर- मात्रांत संकोचेकरून जी स्थिति तो बंध, त्याचें कारण धर्म व अधर्म, त्यांचें सं यमानें शैथिल्य होते तेणेकरून व चित्ताचा प्रचार ( संचार ) जेणेकरून होतो तो प्रचार ह्मणजे नाडीसमूह त्याच्या ही संयमानें संवेदन ह्मणजे ह्या वेळेस ह्या नाडीनें चित्त संचार करितें अर्से ज्ञान होते. तसे प्राण व इंद्रियें ह्यांच्या संचारा- ला मार्गरूप ज्या नाड्या असतात त्यांचे ज्ञान होतें. तें झाले असतां जसा गृह- प्रवेशाला प्रतिबंधक रज्जूचा नाशानें मार्ग झाले असता आपल्या अथवा दुस- प्याच्या घरांत प्रवेश करिता येतो तसा चित्ताचा मृत अथवा जीवत्परशरीरा- मध्यें प्रवेश करितां येतो. त्यामागून वहिरिद्रियें जीती भृंगराजाच्या मागून मक्षिके सारखी प्रवेश करितात. ॥ ३८ ॥ उदानजयाजलपंकर्कटकाविष्वसंगउत्क्रांतिच ॥ ३९ ॥ इंद्रियांची प्रवृत्ति दोन प्रकारची आहे. रूपादिकांचे आलोचन हें स्वरूप जीचें ती बाह्या. केवल जीवनाला (शरीरधारणाला ) कारणीभूत प्रयत्नरूपा ती आभ्यंतर प्रवृत्ति ती सर्व इंद्रियांवर राहणारी आहे. माणादि पंच वायूंच्या संचाराला ही निमित्त होत्ये त्यांत नासिकेच्या अग्रापासून हृदयापर्यंत स्थित जो वायु होतो तो प्राण जाणावा. हृदयापासून नाभिपर्यंत स्थित होतो तो समान जाणावा. कारण, भक्षित अन्नाचा सारिखा परिणाम तो करितो. नाभी- पासून पादतलपर्यंत स्थित होतो तो अपान जाणावा. कारण, तो अन्नमला चें अपनयन (विसर्जन ) करितो. नासिकाग्रापासून मस्तकपर्यंत राहतो तो उदान जाणावा. तोच प्राणोत्क्रमाला कारण होतो. आणि सर्व देहांत संचार करितो
पान:पातंजल योगदर्शन.pdf/८६
Appearance