(७६) अशा बाह्यसिद्धी सांगून आतां आध्यात्मिक सिद्धी सांगतात. नाभिचक्रेकायव्यूहज्ञानम् ॥ २९ ॥ शरीराच्या मध्यभागी जे नाभिचक्र तें, चतुष्पत्र आधारचक्र व षद्वत्र लिंग- चक्र या दोहोंच्या वरचे भागांत स्थित आहे तें दशपत्र आहे त्याचेठायीं चित्त- संयमानें देहाच्या आंतीलव बाहेरचा रचना विशेष योगी सर्व जाणतो. तो असा. वात, पित्त व कफ हे तीन दोप आहेत. त्वचा, रक्त, मांस, स्नायु, अस्थि, मज्जा, वीर्य हे सात धातु आहेत. त्यांत पहिले पहिले बाह्य आहेत. ह्या प्रकारची शरी- राची रचना ती जाणली जात्ये ॥ २९ ॥ कंठकूपेक्षुत्पिपासानिवृत्तिः ॥ ३० ॥ जिव्हेच्या मध्यतंतूचे खालीं कूपाकार कंठाचा प्रदेश आहे. जेथें प्राणादि वा- यूचा संघर्ष झाल्यानें क्षुधा व तृषा होतात तेथें संयम केल्यानें क्षुधा व तृषा ह्यांची निवृत्ति होते ॥ ३० ॥ कूर्मनाड्यांस्थैर्यम् ॥ ३१ ॥ पूर्वोक्त कूपाकार मदेशाच्या अधोभागी वक्षःस्थलांत कूर्माकारा एक नाडी आहे तिच्याठायीं संयमानें तिच्यामध्यें प्रविष्टझालेल्या चित्ताचें स्थैर्य सिद्ध होते ॥ ३१॥ मूर्धज्योतिषिसिद्धदर्शनम् ॥ ३२ ॥ मस्तकांत ब्रह्मरंध्र नामक एक छिद्र आहे तें मुषुम्नानाडीच्या योगानें आणि हृदयांतील चित्तमणीच्या प्रभेच्या योगानें अति तेजस्वि आहे साच्याठाय संयमानें योगिजन हे जगांतीलसिद्धपुरुष अदृश्य असले तरी सांचें दर्शन करितात ||३२|| प्रातिभादासर्वम् ॥ ३३ ॥ विवेकख्या तिरूप जें ज्ञान ज्याला प्रसंख्यान असें ह्मणतात, ते संसारापासून तारणारे आहे याच्या प्राप्तीकरितां यांत संयम केला असतां मसंख्यान पुढें होण्याचें सूचक असे प्रतिभेनें ह्मणजे तर्कमात्राने झालेले जे प्रातिभज्ञान होतें तेणें- करून योगी सर्व जाणतो हेही पक्षांतर आहे. हे जसे सूर्योदयाची सूचिका अरु- णप्रभा होते तीणेकरून लोक पाहूं लागतात तसे जाणावें. भोजराजकृत वार्ति- कामध्ये तर कोणसाही निमित्ताची अपेक्षा न करणारें केवळ मनापासून उत्पन्न होणारें खरें शीघ्र होणारे जे ज्ञान ती प्रतिभा तिच्यांत संयमानें ज्ञान होतें तें प्रातिभ, ते तारक विवेकख्यातीच्या पूर्वी होते तेणेंकरून योगी सर्व जाणतो असे व्याख्यान केलें आहे ॥ ३३ ॥
पान:पातंजल योगदर्शन.pdf/८४
Appearance