Jump to content

पान:पातंजल योगदर्शन.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(६५) तद् पिबहिरंगनिर्बीजस्य ॥ ८ ॥ असंगज्ञात समाधीचें धारणादित्रय ही बहिरंगच आहे कारण, अंगी जो असंप- ज्ञातसमाधि तो, निर्विषय असल्याने आणि हें त्रय सविषय असल्यानें समान विषय- ता दोघांची नाहीं ह्या सविषयत्वामुळे व्युत्थानरूप होणारें जें त्रय त्यांचा संप्रज्ञाता- च्या परिपक्वतादर्शेत प्रज्ञाप्रसादरूप परवैराग्यानें निरोध झालाअसता संप्रज्ञा- ताचाही निरोध होतो ह्मणून तो निर्बीज असंप्रज्ञात समाधी होतो अशा परंपरेनें हैं त्रय उपकारक होतें ह्मणून निर्बीजाचें बहिरंग सौंधन होतें ॥ ८ ॥ आतां संयमापासून विभूति ह्मणजे सिद्धी होतात त्या सांगण्याकरितां संयमा नें जाणण्याला योग्य असे चित्ताचे अन्यपरिणाम दाखवितात . व्युत्थान निरोध संस्कारयोरभिभवप्रादुर्भावनि रोधक्षणचित्तान्वयोनिरोधपरिणामः ॥ ९ ॥ येथें व्युत्थानह्मणजे संप्रज्ञात समाधि, तो ज्यानें निरुद्धकेला जातो तें परखैरा- ग्यच निरोध, त्यांत जेव्हां व्युत्थानसंस्काराचा तिरोभाव व निरोधसंस्का- राचा प्रादुर्भाव हे होतात तेव्हां निरोधसंस्कार ह्मणजे असंप्रज्ञात समाधि त्याच्या क्षणानें अवसरानें चित्त युक्त होतें, तो जो निरोध क्षणयुक्त चित्तरूपी धर्मी त्याला त्रिगुणत्व असल्यानें तो चल असून सर्वदा परिणामस्वभाव असतो 64 होईल, जर माझ्याठार्थी चित्त स्थिर करण्याची तुझी शक्ति नसेल तर अभ्यासाच्या योगानें माझ्या प्राप्तीची इच्छा कर अभ्यासही होणार नाहीं तर कर्मपर हो ह्यावरून जशी पक्ष्यां- ची आकाशांत गात दोन पक्षांनी होसे तसेंच ज्ञान व कर्म ह्या दोन साधनानीं योगी परमपदाला प्राप्त होतो " इत्यादि वाक्यें जीं तीं अंगे व अंगी ह्यांचे कमेंकरून अनुष्ठान करावें इतकेच बोधन करितात, मोक्षाकरितां दोन्ही आवश्यक आहेत असे बोधन नाहीं करीत असे विज्ञा० ५८ पूर्वी सांगितलेले विदेहप्रकृतिलय असे जे देव विशेष, उत्पत्तीपासूनच ज्यांस ज्ञान व वैराग्य झाली आहेत त्यांस अवांतर प्रल्यामध्ये संयमावांचूनच असंप्रज्ञात योग होतो ह्मणून हे त्रय यांला बहिरंगसाधन आहे. ह्याला प्रमाण सप्तशती प्रभृतीमध्ये भगवान् विष्णु जो तो प्रलयकाळ जेव्हां सर्व जगत् एक समुद्रमय झाले तेव्हां शेषाचे आस्तरण करून योगनिद्रेचें सेवन करिता झाला अशी वाक्यें आहेत असें विज्ञा० ५९ ह्या निरोध काळांत होणारा जो संस्कार तोच निरोधसंस्कार सांगितला आहे त्यानें संप्रज्ञातरूप निरोधाला संस्कारजनकता नसली तरी त्या काळी होणाऱ्या प्रज्ञानन्य संस्का रालाच निरोधसंस्कारत्र उपपन्न होतें ह्मणून चित्तरूप धर्मीचा हा निरोधपरिणाम धर्म प रिणाम आहे धर्म हा द्रव्य मानां किंवा गुण मानां असे विज्ञा० ९