Jump to content

पान:पातंजल योगदर्शन.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(६२) तर सर्वोपाधिरहित असे त्याचे चिंतन करावें ही धारणा जाणावी कारण ईश्व- राच्या ठाय चित्ताचें धारण केले जातें हेराजन तें हरीचें सगुणस्वरूप ज्याप्रका- रानें चिंतितकरावें तें ऐक. चित्त स्थिर करण्याला कांही आधार नसेलतर धारणा संभवणार नाहीं ( ह्मणून आधारभूत परमेश्वराचे स्वरूप चिंतनीय आहे ) ते कसें तर प्रसादयुक्त आहे मुख ज्याचें, अतिसुंदर कमलपत्रासारिखे आहेत नेत्र ज्याचे, सुंदर आहेत कपोल ह्मणजे गाल ज्याचे अतिविस्तृत फलकाकार कपा- ळाच्या योगानें कांतियुक्त असें, सारिख्या प्रांताच्याठायीं धारित केलें आहे सुंदर कुंडलरूप भूषण ज्याच्याठायीं, शंखासारिखाआहे गळा ज्याचा. अतिवि स्तारयुक्त श्रीवत्सचिन्हानें युक्त आहे वक्षस्थल ज्याचें, वलीच्या तीन रचना आहेत ज्याच्याठायीं, व गंभीरनाभीनेंयुक्त अशा उदरानें उपलक्षित (युक्त) असें, दीर्घ असे आठ किंवा चार आहेत भुज ज्याचे, सारिख्यास्थित आहेत ऊरु व जंधा ज्याच्या शोभन असून स्थिर आहेत चरणकमले व हस्तकमलें ज्याचीं, आणि पीतवर्णानेंयुक्त व निर्मल असें आहे वस्त्र ज्याचें! असा ब्रह्मस्वरूपपरमात्मा विष्णु त्याचें चिंतन करावें. १ धारणेनें सिद्ध होणाऱ्या ध्यानाचें लक्षण सांगतात || तत्र प्रत्ययैकतानताध्यानम् ॥ २ ॥ ज्या वस्तूच्याठायीं चित्ताच्या विरुद्धवृत्तीची निवृत्ति करण्याविषयी प्रयत्न करावा लागतो ती धारणा. त्याच वस्तूच्याठायीं जी प्रत्ययांची ह्मणजे वृत्तींची एकतानता ह्मणजे यत्न केल्यावांचून एकवस्तु विषयता तें ध्यानजाणावें. त्या पर मेश्वराच्या स्वरूपाच्याठायीं, अन्य विषयापासून व्यावृत्त असा जो एकाग्रतेचा प्र वाह तें ध्यान जाणावें व तें यमनियमादिक सहा साधनानी संपादित केलें जातें, असें विष्णुपुराणांतच खंडिकापुत्र जनकराजाप्रत केशिध्वजनामक मुनीने सांगि तलें आहे ॥ २ ॥ योगांग समाधीचें लक्षण सांगतात || तदेवार्थमात्र निर्भासंस्वरूपशून्यमिवसमाधिः ॥ ३ ॥ अत्यंतशुद्ध चित्तवृत्तीचें प्रवाहरूप जें ध्यान, तेंच केवल अर्थाच्या स्वरूपानें भा- ५३ नाम्पादि देशांच्या ठार्थी स्थित जे ईश्वरस्वरूप त्याला विषय करून सतत चालणारी जी बुद्धिवृत्ती जी कदापि अन्य वृत्तीनें स्पष्ट न होणारी तिला योगिजन ध्यान ह्मणतात असे ईश्वरगीतेत सांगितले आहे. पूर्वोक्त धारणाकालापेक्षां द्वादश गुणित कालाने ध्यान होते असे कक्षणांतर गरुडपुराणांत सांगितले आहे.