(५७) आसनाच्या जयापासून शीतोष्णादि द्वंद्वांची पीडा होत नाहीं ॥ ४८ ॥ आतां आसनाची सिद्धि झाल्यानंतर कर्तव्य प्राणायाम सांगतात. तस्मिनसतिश्वासप्रश्वासयोर्गतिविच्छेदः प्राणायामः ॥ १९ ॥ आसनाचें स्थिरत्व झालें असतां बाह्य वायूच्या अंतर्गमनाचा विच्छेद व आभ्यंतर वायूच्या बहिर्गमनाचा विच्छेद (विराम) तो प्राणायाम जाणावा ॥४९॥ अर्से सामान्य लक्षण सांगून लक्षणीय प्राणायामाचा विभाग करून दाखवितात।। बाह्याभ्यंतरस्तंभवृत्तिर्देश काल संख्याभिः परिदृष्टोदीर्घः सूक्ष्मः ॥ ५० ॥ बाह्यवृत्ति, आभ्यंतर वृत्ति, स्तंभवृत्ति व तुरीय अशा भेदानें प्राणायास चार प्रकारचा आहे. त्यांत कोक्यांतील (हृदयांतील) वायु रेचनानें बाहेर काढून त्याचें बाहेरच धारण करणें तो बाह्य वृत्ति, व तोच रेचक जाणावा. बाहेरच्या वायूचें नासिकाद्वारानें हृदयांत पूरण करून त्याचें आंतच धारण करणें तो आभ्यं- तरवृत्ति व तोच पूरक जाणावा. रेचन व पूरण ह्यांच्या प्रयत्नावांचून प्राण वायूच्या धारणमात्राच्या प्रयत्नानें गतीचा विराम तो स्तंभवृत्ति, तोच कुंभक जाणावा. हा आंतच राहतो ह्मणून रेचक नाहीं, तापलेल्या पाषाणावर टाकले- ला जलबिंदु जसा संकुचित होतो तसा हा प्राणवायु हृदयांत संकुचित होऊ- न सूक्ष्म होतो ह्मणून तो पूरक ही नाहीं. जो स्थूल असून आंत निरुद्ध होऊन देहाला पूरित करितो तो पूरक यास्तव रेचक व पूरक हे न करितां एकवार प्रयत्नानें सूक्ष्म झालेला प्राणवायु ज्याला कुंभक ह्मणतात तो, घटस्थजलासारि- खा देहांत निश्चल राहातो ह्मणून हा कुंभक तिसरा सिद्ध होतो. तीन्हींप्रकारचा हा प्राणायाम, देश, काल व संख्या ह्यानीं दीर्घ होऊन सूक्ष्म होतो असा दृष्ट आहे. त्यांत नासिकेच्या बाहेरचा देश तो रेचकाचा विषय आहे, तो प्रादेश ह्मणजे अंगुष्टाग्रापासून तर्जन्यग्रपर्यंत लांबी, वीत, हात, व दोनहात वगैरे अशापरिमा- णाचा होतो, तो, श्वासोच्छ्वास रहित नासाग्राच्याठायीं एकाकाडीच्या अग्रभागी ४७ बरें? अशाप्रकाराने एकेकाला भिन्नभिन्न प्राणायामत्व येईल तें अनिष्ट आहे "कारण रेचक, पूरक व कुंभक ह्या तीहीकरून प्राणायाम जाणावा, इत्यादि वाक्यांमध्ये तीन्हीं मिळून एक प्राणायाम होतो असे सांगितलेले विरुद्ध होईल अशी शंका घेऊं नये, कारण प्रथम भूमिके मध्ये रेचकादित्रयाच्या पौर्वापर्य कर्मकरून बरोबरच अनुष्ठानाचा नियम आहे त्याव- रून मिलितांस एकत्वव्यवहार आहे तो गौण आहे वस्तुत: पूर्वोक्त वाक्यांत मिलितांसच प्राणायामत्व आहे असे विवक्षित नाहीं, कारण वसिष्ठसंहितेमध्ये “ रेचक व पूरक ह्यांचा त्याग करून जें सुखेंकरून वायूचे स्तंभन केले जातें तो हा प्राणायाम केवल कुंभक असा सांगितला आहे " ह्मणून केवल कुंभकालाही प्राणायामत्व सांगितले आहे असे विज्ञा० ८
पान:पातंजल योगदर्शन.pdf/६५
Appearance