Jump to content

पान:पातंजल योगदर्शन.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(५६) स्थिरसुखमासनम् ॥ १६ ॥ निश्चल असून सुखकर होणारें तें योगाला साधनीभूत आसन जाणावें. आस्यते ह्मणजे स्थिरपणानें बसलें जातें जेणें करून तें आसन, तें दोन प्रकारचें. बाह्य व शारीर. त्यांत कंबलादिवत्र खालीं त्यावर मृगादिवर्म त्यावर दर्भासन अथवा ह्यांनून कोणतेही एक हैं उत्तम बाह्य जाणावें. पद्मासन, स्वस्तिकासन व गैरे हैं शारीर. असा भेद आहे त्यांत पद्मासन शिष्टलोक मांडी घालून बसतात तें प्रसिद्ध आहे. डावा पाय आकुंचित करून उजव्या पायाची जंघा व ऊरु ह्यां- च्या मध्ये प्रविष्ट करावा तसाच उजवा डाव्याच्या मध्यें प्रविष्ट करावा है स्वरित कासन जाणावें. व दोन्हीं तळपाय वृषणाच्या ( अंडाच्या ) जवळ संपुटाकार जोडून त्यावर हस्त हे संपुटाकार करून स्थापित करावे हैं भद्रासन जाणावें ॥४६ आतां आसन हैं स्थिर होण्याचे उपाय सांगतात. प्रयत्नशैथिल्यानंतसमापत्तिभ्याम् ॥ ४७ ॥ कोणत्याही बाह्य आंतर कार्याचा प्रयत्न स्वभावतः चंचल आहे ह्मणून तो आसनाचा प्रतिबंध करितो त्याचें शैथिल्य ह्मणजे विराम केल्याने आसन सिद्ध होतें, जेणे करून अंगकंप होत नाहीं. आणि अनंत जो नागराज शेष तो कसा तर अत्यंत स्थिर सहस्र फणानीं धारित केले आहे सर्व जगत् ज्यानें असा त्या- च्या ठायीं चित्ताच्या एकाग्रतेनें देहाभिमान सुटतो, त्यानें आसनाच्या दुःखाचें स्फुरण होत नाहीं ह्मणून आसन सिद्ध होतें ॥ ४७ ॥ आसन सिद्धीचें ज्ञापक सांगतात. ततोद्वंद्वानभिघातः ॥ ४८ ४५ पद्मासनादिक चार आसने वसिष्ठसंहितेत सांगितली ती अशी "दोन्ही मांड्यावर दोन्ही पादतलें ठेऊन दक्षिण हस्ताने दक्षिण पादांगुठाला व नाम हस्तानें वामपादांगुष्ठाला दृढ स्पर्श करावा ह्मणजे है पद्मासन होते हे सर्वमान्य आहे. एक मांडीवर एक पाद- स्थापन करून दुसऱ्या मांडीवर दुसरे पादाचें स्थापन मात्र करावे ह्मणजे हें वीरासन होते असे सांगितले आहे ह्याचेंच अर्धे केले ह्मणजे तें अर्धासनही ह्मणवते तसे अंडाच्या खा- कची मध्यरेखा तो सोवनी ह्मणवत्ये तिच्या दोन्ही बाजूला पादाचे पृष्ठ भाग जोडून स्थापित करावे व ते दोन्ही पाद दोन्ही हस्तानी बळकट धरावे ह्मणजे हे सर्व रोग दूर करणारे असे भद्रासन होते आणि जंघा व मांड्या ह्यांच्यामध्ये दोन्हीं पादतले करून सरल शरीर करून सुखाने वसणे ह्याला स्वस्तिकासन असें ह्मणतात असें विज्ञा० ४६ तें आसनाचे दार्च जे ते अनंत जोशेष ह्याच्या अनुग्रहेकरून किंवा सजातीयभाव • नावशे करून अथवा अदृष्टविशेषाच्या वशेकरून होते असे विज्ञा०