(५३ ) पुनः तीन तीन प्रकारची होत्ये मांसचर्म वगैरे ह्यांच्या लोभानें, ह्यानें अपकार केला अर्से समजून ती क्रोधानें देवतादि तृप्तीनें मला धर्म होईल असे समजून ती मोहानें ह्याप्रकारें नऊ प्रकारची हिंसा झाली, पुनः लोभ, क्रोध, व मोह हेही एकैक मृदु, मध्य व अधिमात्र ह्या भेकरून तीन तीन प्रकारचे होतात. ह्या भेदानें लोभादिपूर्वक हिंसादिके हे मृदु, मध्य, व अधिमात्र असे होतात तशा कृता, कारिता, व अनुमोदिता ह्या हिंसा एकैक नऊ नऊ प्रकारच्या होतात. असे हिंसे- चे सत्तावीस भेद होतात. मृदु, मध्य व अधिमात्र हेही भेद मृदुमृदु ( अति- मृदु ) मध्यमृदु, तीव्रमृदु, मृदुमध्य, मध्यमध्य, तीव्रमध्य, मृदुतीव्र, मध्यतीव्र, तीव्रतीव्र, ह्या भेवेंकरून एकैक तीन तीन प्रकारचे होतात. ह्या प्रकारें लोभ, क्रोध, व मोह हेही नऊ नऊ प्रकारचे होतात, ह्मणून तन्मूलक कृता हिंसा सत्ता- वीस प्रकारची होत्ये तशीच कारिता व अनुमोदिता मिळून एकंदर एक्यायशीं प्रकारची हिंसा होत्ये. ह्या प्रकारें अनृतस्तेयादिकांमध्येही (भेदांची ) योजना करावी. ह्या प्रकारचे हिंसादिक जे वितर्क ते नरकादि दुःख, आणि स्थावरभाव ( वृक्षादिजन्म ) भ्रांति व संशय ह्या प्रकारचें अज्ञान अनंत उत्पन्न करितात; ह्मणून प्रतिपक्ष ह्मणजे वितर्कांचे शत्रु हिंसादिकांचे दोष त्यांचे चिंत न करीत असावें. त्या दोषचिंतनानें वितर्क हे त्याज्य आहेत असें कथित होते. ह्या वितर्कांचा नाश झाला असतां अहिंसादिक दहा निर्विघ्न सिद्ध होतात, त्यांची सिद्धि झाली असतां चित्तशुद्धि होऊन कैवल्य प्राप्त होतें ह्मणून योग हा सिद्धी देतो असें तात्पर्य आहे ।। ३४ ।। आतां अहिंसादिक दहांच्या सिद्धींचें ज्ञापक अवांतर (गौग ) फल क्रमक- रून दाखवितात. अहिंसाप्रतिष्ठायांतत्संनिर्घोवैरत्यागः ॥ ३५ ॥ अहिंसेची सिद्धि खरी झाली असता त्या अहिंसकमुनिश्रेष्ठाजवळ, सर्पन- कुलादिक हीं स्वभावतःच द्वेषी असली तरी त्यांचें वैर नष्ट होतें ।। ३५ ।। सत्यप्रतिष्ठायांक्रियाकलाश्रयत्वम् ॥ ३६ ॥ सत्याची स्थिरता झाली असतां धर्माधर्मरूपक्रिया व तिचे फल स्वर्गादिक ह्याचें आश्रयत्व ह्मणजे वचनमात्रानें दातृत्वशक्तिही सिद्ध होत्ये. जसें “तूं धार्मिक होशील" असें ह्मणतांच तो धार्मिक होतो. स्वर्गाला जा असें ह्मणतांच तो अधा- र्मिक असला तरी स्वर्गाला जातो ।। ३६ || अस्तेयप्रतिष्ठायां सर्वरत्नोपस्थानम् ॥ ३७ ॥ चौर्य न करण्याचा दृढ निश्चय करणाऱ्या योगीला इच्छामात्रैकरून सर्व दि- व्यरत्नांची प्राप्ति होत्ये ॥ ३७ ॥
पान:पातंजल योगदर्शन.pdf/६१
Appearance