Jump to content

पान:पातंजल योगदर्शन.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(५३) वगैरे पवित्र आहाराने केलेलें तें बाह्य जाणावें व मैत्र्यादिभावनें करून चित्ता- घ्याठायी असूयादिदोष नसणें तें आभ्यंतर जाणावें संतोष ह्मणजे कोणाला पीडा न देतां प्राप्त झालेले जें प्राणरक्षणापुरतें अन्न त्यानें तुष्टि. शीतो- ष्णादिद्वंद्वसहन करणें व यथाशक्ति कृच्छ्र चांद्रायण वगैरे करणें हें तप जाणावें. प्रणवादिकांचा जप वगैरे हा स्वाध्याय जाणावा. व " ज्ञानानें अथवा अज्ञाना- नें जें मी शुभ वा अशुभ कर्म करितों तें सर्व तुला अर्पित केले, तुझ्या प्रेरणेने मी करितों. तसे शरीरानें मनानें किंवा वाणीनें जी मी क्रिया नित्य करितों ती जन्म जन्मांतरामध्यें ही केशव जो परमात्मा त्याच्या आराधनाविषयों असो" ह्या प्रकारें करून ईश्वराच्याठायीं सर्व पुण्य कर्माचें अर्पणकरणें हें ईश्वरप्रणिधा- न जाणावें ॥ ३२ ॥ वितर्कबाधने प्रतिपक्षभावनम् ॥ ३३ ॥ ह्या अपकायला मी मारीन, असत्य बोलेन, परद्रव्य हरण करीन इत्यादिक जे हिंसादि संकल्परूप वितर्क तीहीकरून हे यम व नियम ह्यांचें बाधन प्राप्त झा- लें असतां यमादिकांचाठायीं तत्पर होऊन ब्राह्मणानें ह्या वितर्काच्या प्रति- बंधकांचें भावन करीत असावें. तें असें "हे भयंकर संसाररूपी अग्रि ह्यांच्याठायीं पुनः पुनः दग्ध होणारा जो मी येणें सर्व प्राण्यानां आपल्यापासून भय न होण्या करितां यमादि धर्म हे शरण (रक्षिते ) असे केले, तो मी हिंसादि दोषांचा त्याग करून पुनः त्यांचे ग्रहण करीन तर कुत्र्यासारिखें माझें वर्तन होईल, जसा कुत्रा ओकलेलें खातो तसा मी टाकिलेल्या वस्तूचें पुनः ग्रहण करितों" ह्या प्रकारेंकरून वितर्काच्या प्रतिबंधकाची भावना करीत असावें ॥ २३ ॥ आतां वितर्कांचे स्वरूप, प्रकार, हेतु, अवांतर भेद व फलें हीं पांच, पदानी क्रमेकरून सांगत असे प्रतिपक्षांचें भावन प्रकाशित करितात. . वितर्काहिंसादयःकृतकारितानुमोदितालोभकोधमोहपूर्विकास दुमध्याधिमात्रा दुःखाज्ञानानंतफला इतिप्रतिपक्षभावनम् ॥ ३४॥ वितर्क्यंते ह्मणजे अनिष्टत्वेन संभावित केले जातात ते वितर्क हिंसादिक जाणावे. हे स्वरूपकथन झालें, त्यांत हिंसा तीन प्रकारची, स्वतः केलेली, 'कर' असे सांगून अन्याकरून करविलेली व दुसरा करीतअसला तर त्याला "चांगले चांगलें" असे ह्मणून अनुमोदन दिलेली अशी जाणावी. त्यांत कारण भेदानें एकैक काराला येईल. तर नाहीं कारण देव, द्विज, गुरु, व विवाह्मण यांचे पूजन आणि शुचि त्व, सरलता, ब्रह्मचर्य व अहिंसा हे सर्व शारीर तप ह्मणवतें अशा स्मृतविरून जो अन्यत्रविहित कर्मे येथे अनुक्त असतील त्यांचा तपामध्ये अतंर्भाव जाणावा असे विज्ञा०