Jump to content

पान:पातंजल योगदर्शन.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४९) अनात्मविषयक समाधीनें प्रधानपर्यंत प्रज्ञा स्थिर झाली तरी आत्मजिज्ञासा बाकी राहिल्याने ती प्रज्ञा शेवटची होत नाहीं. ह्या प्रकारेंच पुढील अवस्थांचे उत्तम चरमत्व जागावें. "त्याज्य जितके बंधाचे हेतु, ते सर्व नष्ट केले आतां मला त्या- ज्य कांहीं राहिलें नाहीं" ही दुसरी अवस्थी. "मोक्षाच्या लोभानें सर्व लभ्यवस्तु मिळालें त्याहून दुसरे कांहीं मला लब्धव्य राहिलें नाहीं" ही तिसरी. "विवेक ख्यातीच्या प्राप्तीनें सर्व कार्य केलें आतां कांहीं कार्य बाकी राहिलें नाहीं" ही चवथी. ह्याचार प्रज्ञेच्या अवस्थानां कार्यविमुक्ति अशी संज्ञा आहे. ज्यान चित्त विमुक्ति अशी संज्ञा आहे त्या अवस्था तीन आहेत, जसे "माझें बुद्धिसत्व हैं कृत- कृत्य झालें" ही पहिली, "बुध्यादिक तवें हीं प्रकृतींचे गुण ह्मणजे धर्म जरी असले तरी ते पर्वताच्या शिखरापासून पडणाऱ्या पाषाणासारिखे मध्यें कोठेंही स्थिर न होतां आपल्या मूलकारणांत लयाभिमुख होऊन दृढ पतनानें असंत तिरोभावाला प्राप्त होतात, प्रयोजन नसल्यामुळे पुनः त्यांचा प्रादुर्भाव होत नाहीं" ही दुसरी, तशी गुणापासून अतिक्रांत (दूर) होऊन स्वस्वरूप मात्रानें रा हणारा असा चिच्छतिमात्र आत्मा आहे अशी प्रज्ञेची अवस्था तिसरी जाणा- वी. ह्या ज्या सात प्रज्ञेच्या भूमि ह्यांच्या प्रकृष्टफलरूप ज्या चरमावस्था त्यांचे कर्मे करून ज्ञान, हान, प्राप्ति, व क्रिया, ह्यांच्या इच्छा आणि शोक, भय, व विक- ल्प ( हे सात बंधनहेतु आहेत ) ह्यांचा नाश करणें हें स्वरूप आहे असें जाणावें २७ ( आतां ह्या प्रज्ञेचीं साधनें सांगतात. योगांगानुष्ठानादशुद्धिक्षयेज्ञानदीप्तिराविवेकख्यातेः ॥ २८ ॥ योगाचीं अंगे व योग सांच्या अनुष्ठानानें क्लेश कर्मरूप अशुद्धीची क्रमेंकरून क्षय होऊं लागला ह्मणजे ज्ञानाची दीप्ति विशुद्धी जी, ती विकल्परहित विवेक ख्यातिपर्यंत होत्थे. सांगयोगाच्या अभ्यासानें चित्तशुद्धि केली असतां प्रज्ञेची सिद्धी उत्तम होत्ये अर्से तात्पर्य ॥ २८ ॥ पोगाचीं अंगे कोणतीं तीं सांगतात. यमनियमासनप्राणायामप्रत्याहारधार णाध्यानसमाधयोऽष्टावंगानि ॥ २९ ॥ ४० ही लिंग शरीराला नाशोन्मुख करणारी अवस्था दुसरी भूमिका असे विज्ञा० ११ जरी ह्या सूत्राच्या भाण्यांत अशुद्धेि शब्दाने पंचपर्व अविद्या घेतली आहे तरी तज्जन्य पापही अशुद्धिरूपच आहे ह्मणून तेही घ्यायें, कारण " पापकर्माच्या क्षयेकरून पुरुषास ज्ञान उत्पन्न होते तेव्हां तो निर्मल आदर्शाप्रमाणे आपल्या ठिकाणींच आपले स्वरूप पाहतो " अशी स्मृति आहे असे विज्ञा० ७