Jump to content

पान:पातंजल योगदर्शन.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संबंधानें भावी अर्थ प्रवर्तक राहिला नाहीं ह्मणून प्रधानाची अप्रवृत्ति झाली तरी अकृतार्थ पुरुषांच्या भोगाकरितां महत्तत्त्वादि रूपांनी प्रवृत्ति होत्ये, ह्मणूनच एक मुक्त झाल्या असतां सर्व मुक्त होत नाहींत ॥ २२ ॥ ह्या प्रकारें करून दृश्य व द्रष्टा ह्यांचे व्याख्यान करून हेयदुःखप्राप्तीचा कारण जो संयोग त्याचें निरूपण करितात ॥ स्वस्वामिशक्त्योः स्वरूपोपलव्धिहेतुः संयोगः ॥ २३ ॥ स्व ह्मणजे दृश्य त्याची शक्ति-जडत्वानें दृश्यत्वाची योग्यता, स्वामी तर पुरुष त्याची शक्ति चेतनत्वरूपानें द्रष्टृत्वाची योग्यता, ह्या दोन्हीं योग्यता त्यांचीं स्वरूपेंच आहेत त्यांहून भिन्न नाहींत. त्या दोन्हीं स्वस्वामि स्वरूपात्मक शक्तिमध्ये अनेक प्रकारच्या शब्दाद्याकारानें परिणत झालेल्या बुद्धिस्वरूपाचें ज्ञान तो भोग, आणि स्वामिस्वरूपाचें ज्ञान तें मोक्षसाधन, ह्या दोहींचे कारण स्वस्वामिभावरूप। संयोग आहे त्यालाच द्रष्टहश्यभाव व भोक्तृभोग्यभाव असें ह्मणतात, तो नसेल तर हक् व दृश्य ह्यांच्या स्वरूपाचें ज्ञान होणार नाहीं आणि तो संयोग आहे ह्मणून तें ज्ञान होतें. तो संयोग ह्या ज्ञानरूपकायांनी अनुमेय आहे प्रत्यक्ष नाहीं असें आचार्यांनी सांगितलें ॥ २३ ॥ ह्या प्रकारचें ह्या संयोगाचें स्वरूप व कार्य सांगून त्याचें कारण सांगतात ॥ तस्य हेतुरविद्या ॥ २४ ॥ अविद्या ह्मणुजे भ्रमात्मक ज्ञानाची वासना ती ह्या संयोगाला कारण जाणावी, 'मी आहे' असें दृक् व दृश्य यांचें अभेदानें ज्ञान होतें ती भ्रांति जाणावी, तिच्या वासनेनें युक्त झालेले चित्त तें मलय कालीं लीन होऊन प्रधानाच्या स्वरूपाला प्राप्त होतें, पुनः सृष्टिकाली पुरुषामत सत्वरूपानें संयुक्त होते, त्या संयोगानें अवि- वेकी पुरुषाला बंध आणि विवेकीला मोक्ष होतो. कारण ही जी अनादि वासने कडून नाना प्रकारची चित्ताच्या ठायीं झालेली अविद्या तीनें चहूंकडून मत्स्या च्या जाळ्यामध्ये बांधल्या सारिखा केलेला जो पुरुषरूपी पशु, तो कसा तर आपल्या कर्मानेंच उत्पन्न करून प्राप्त केलेल्या दुःखाचा त्याग करणारा व त्यक्त दुःखाचें पुनः ग्रहण करणारा आणि हेय मात्र अस्मिता इंद्रिय वगैरे अनात्मवस्तु त्यांच्या ठायींच अहंकार व ममकार पुनः पुनः करणारा असा झालेला त्याला बाह्य व आध्यात्मिक अशा दोन प्रकारच्या कारणापासून झालेले त्रिविधतापपीडा देतात २४ ३९ “शरीर, बहिरिंद्रियें व मन ह्यांनी संयुक्त जे चैतन्य याला तत्त्ववेत्ते भोक्ता अर्से स " असे कठवल्लति सांगितले आहे त्यावरून ही लिंगदेह व आत्मा झांच्या संयोगा- पासूनच अत्म्याला विषय दर्शन होते असे विज्ञा० णतात