(२७) जो चित्तरूपी मणि त्याच्या विषयित्वात्मक स्वरूपाचा अभिभव होऊन त्याला जी ग्रा ह्यविषयाकारमात्राची प्राप्ति होत्ये तो संप्रज्ञातसमाधि जाणावा. तो पूर्वोक्त वितर्क, विचार, आनंद, व अस्मिता ह्या चार रूपांनी निश्चित होतो ह्मणून चार प्रकारचा जाणावा. ह्या सूत्रांत अर्थक्रमाच्या बलानें पाठक्रम सोडून ग्राह्य ग्रहण व ग्रहीता यांच्याठायी यानींच उपरक्त (संयुक्त) झालेल्या चित्ताला तदंजनता झणजे स्व रूपाचा त्याग करून प्राप्त झालेली जी ग्राह्याद्याकारता तिची उत्तम प्राप्ति अर्से व्याख्यान करावें; कारण स्थूल व सूक्ष्म ह्या विषयांच्या क्रमेकरूनच चित्ताला ग्रही तृ पुरुषमात्राचा उपराग (संबंध) राहतो. "तत्स्थ" हें पद भिन्न, लुप्तषष्ठीक, स्यां त ह्मणजे "तत्स्थस्य" असें कल्पित करून" क्षीणवृत्तेः तत्स्थस्य" अशी अन्वय योजना करावी. अथवा तत्स्थ असें जें अंजन त्याचा जो भाव ती तत्स्थत दंजनता तिची जी क्षीणमलचित्ताला समापत्ति (संबंधमाप्ति) असा अर्थ जाणावा ॥४१॥ ती ही पहिल्या दोन रूपांनी निश्चित केलेली संप्रज्ञातसमापत्ति ती पुनः सवि- तर्का, निर्वितर्का, सविचारा, निर्विचारा, ह्या च्यार अवांतर ( पोट ) भेदांनी चार प्रकारची होत्ये; त्यामध्ये सवितर्केचें स्वरूप सांगतात. तत्रशब्दार्थज्ञान विकल्पैः संकीर्णासवितर्का ॥ ४२ ॥ त्या समापत्तिमध्यें सवितर्कासमापत्ति ही अशी जागावी तेंच उपपादन करितों. शब्द, अर्थ व ज्ञान हीं तीन एकरूप अशी भासतात. त्यांत गौरित्याकारक शब्द अ सा जो एक विकल्प होतो तो, हा गौ आहे अशा प्रत्यक्षानें ज्ञात अर्थ व त्याचें ज्ञान ह्या दोघांचा शब्दाशी जो अभेद ( एकरूपता ) त्याला विषय करतो. तसा जेथें गौ- रित्याकारक अर्थ असा एक विकल्प होतो तेथें "गौः" इतक्यानें गृहीत शब्द व ज्ञान यांचा अर्थाशी जो अभेद तद्विषयक होतो. या प्रमाणे गौरित्याकारक ज्ञान असा एक विकल्प होतो तो तर 'गौः' इतक्या पदानें गृहीत शब्द व अर्थ यांचा ज्ञाना- शीं जो अभेद त्याला विषय करितो. ते हे प्रत्यय, वस्तुतः शब्द, अर्थ, व ज्ञान यां चा अभेद नसून त्याला विषय करितात ह्मणून विकल्पात्मक आहेत. असेच हा घट हा पट इत्यादि प्रत्यय ते सर्व विकल्प जाणावे. त्यांत शब्द व ज्ञान यांशीं अभेदानें विकल्पित स्थूल गवादिक अर्थाच्याठायीं समाधियुक्त चित्त असा झालेला जोयो- गी त्याला समाधीपासून झालेला साक्षात्कार जशा जशा विकल्पितार्थाला विषय करितो तशी ती समाधिप्रज्ञा शब्द, अर्थ, व ज्ञान यांच्या विकल्पानी सं
पान:पातंजल योगदर्शन.pdf/३५
Appearance